ओळख

या दस्तावेजात खालील विषय समाविष्ट आहेत:

  • प्रतिष्ठापना संबंधी टिपा

  • तंत्रज्ञान पूर्वदृश्ये

  • ज्ञात मुद्दे

  • सामान्य माहिती

  • आंतरराष्ट्रीयकरण

  • कर्नल टिपा

Red Hat Enterprise Linux 4.92 वरील उशीरा येणाऱ्या माहितीसाठी जी प्रकाशन टिपांमध्ये आढळत नाही, तिच्यासाठी खालील URL वर Red Hat Knowledgebase चा संदर्भ घ्या:

http://kbase.redhat.com/faq/topten_105_0.shtm

प्रतिष्ठापना संबंधी टिपा

खालील विभागात Red Hat Enterprise Linux ची प्रतिष्ठापना आणि ऍनाकोंडा प्रतिष्ठापना कार्यक्रमास विशिष्ट माहितीचा समावेश होतो.

टीप

आधीच प्रतिष्ठापित असलेल्या Red Hat Enterprise Linux यांना सुधारित करण्यासाठी, तुम्ही त्या बदललेल्या संकुलांस अद्ययावत करण्यासाठी Red Hat Network चा वापर केलाच पाहिजे.

Red Hat Enterprise Linux 4.92 चे ताजे प्रतिष्ठापन करण्यासाठी किंवा Red Hat Enterprise Linux 4 च्या नविनतम अद्ययावत आवृत्ती पासून Red Hat Enterprise Linux 4.92 मध्ये सुधारणा करण्यासाठी तुम्ही ऍनाकोंडाचा वापर करू शकता.

जर तुम्ही Red Hat Enterprise Linux 4.92 CD-ROMs मधील समाविष्टांस प्रतिलिपीत करत असाल (उदाहरणार्थ, संजाळ-आधारित प्रतिष्ठापनाची तयारी करताना) तर फक्त कार्यकारी प्रणाली(ऑपरेटींग सिस्टीम)साठीच प्रतिलिपी करण्याची खात्री असू द्या. Supplementary CD-ROM, किंवा कोणतेही स्तरीय उत्पाद CD-ROMs प्रतिलिपी करू नका, कारण ते Anaconda च्या योग्य कार्यास आवश्यक अशा फाइल्स गिरवून टाकेल. Red Hat Enterprise Linux प्रतिष्ठापित झाल्या नंतरच हे CD-ROMs प्रतिष्ठापित करावेत.

Note that the minimum RAM required to install Red Hat Enterprise Linux 4.92 has been raised to 1GB; the recommended RAM is 2GB. If a machine has less than 1GB RAM, the installation process may hang.

ISO समाविष्टे आणि नोंदणी

Red Hat Enterprise Linux 4.92 मध्ये मीडिया किटचे आर्किटेक्चर Red Hat Enterprise Linux च्या मागील आवृत्त्यांपासून बदलले आहे. विविध पर्यायी रूपे आणि ISO प्रतिमांची संख्या दोन वर आणली गेली आहे:

  • Red Hat Enterprise Linux 4.92 सेवक

  • Red Hat Enterprise Linux 4.92 क्लाएंट

वृक्षामध्ये बऱ्याच पर्यायांसाठी रिपॉझिटरीजचा समावेश होतो ज्या कोर वितरणावर अतिरिक्त कार्यशीलता पुरवतात:

Red Hat Enterprise Linux 4.92 सेवक

  • Red Hat Enterprise Linux — ४ आभासी अवतारांपर्यंत आधारासह आभासीकरणाच्या समावेशासह मुलभूत बहू हेतू सेवक कार्यकारी प्रणाली.

  • Red Hat Enterprise Linux आभासीकरण प्लॅटफॉर्म — क्लस्टरींग आणि क्लस्टर स्टोरेज यांसह डेटाकेंद्र आभासीकरण कार्यकारी प्रणाली.

Red Hat Enterprise Linux 4.92 क्लाएंट

  • Red Hat Enterprise Linux डेस्कटॉप — ज्ञान-कर्मचारी डेस्कटॉप उत्पाद

  • कार्यस्थानक पर्याय — अभियांत्रिकी आणि विकास कार्यस्थानकांसाठी जोडण्यायोग्य पर्याय

  • Virtualization Option — add-on option for virtualization support

सारख्याच वृक्षातील किंवा ISO प्रतिमेतील पर्यायी समाविष्टांसह, प्रतिष्ठापनाद्वारे पुरवलेले घटक आणि सभासदत्वाद्वारे पुरवलेले घटक यांतील विजोडता टाळणे आवश्यक आहे. अशी विजोडता त्रुटी किंवा मर्मभेदी जोखीम यांस कारणीभूत होऊ शकते.

पुरवलेले घटक सभासदत्वाशी जुळणारे असल्याची खात्री करण्यासाठी, Red Hat Enterprise Linux 4.92 ला प्रतिष्ठापन क्रमांक जो प्रतिष्ठापकास योग्य संकुल संच पुरवण्यास रचण्यासाठी वापरला जाईल तो दाखल करणे आवश्यक आहे.

जर तुम्ही प्रतिष्ठापन क्रमांक दाखल करणे टाळले तर, कोर सेवक किंवा डेस्कटॉप प्रतिष्ठापन होईल. अतिरिक्त कार्यशीलता नंतर स्वहस्ते जोडता येऊ शकतात.

वापरण्याजोग्या मुलभूत संख्या आहेत:

सेवक

  • Red Hat Enterprise Linux (Server ): 31cfdaf1358c25da

  • Red Hat Enterprise Linux (Server + Virtualization): 2515dd4e215225dd

  • Red Hat Enterprise Linux आभासीकरण प्लॅटफॉर्म: 49af89414d147589

क्लाएंट

  • Red Hat Enterprise Linux कार्यक्षेत्र: 660266e267419c67

  • Red Hat Enterprise Linux Desktop / Virtualization Option: fed67649ff918c77

  • Red Hat Enterprise Linux कार्यस्थळ / कार्यस्थानक पर्याय: da3122afdb7edd23

  • Red Hat Enterprise Linux Desktop / Workstation / Virtualization Option: 7fcc43557e9bbc42

Subversion

Red Hat Enterprise Linux 4.92 मध्ये, Subversion आवृत्ती नियंत्रण प्रणाली Berkeley DB 4.3 विरूद्ध जोडली आहे. जर Red Hat Enterprise Linux 4 पासून सुधारणा करत असाल आणि Subversion रिपोझिटरीझ Berkeley DB बॅकएंड "BDB" (शुद्ध फाइल प्रणाली आधारित "FSFS" बॅकएंडऐवजी), वापरून प्रणालीवर निर्माण केली असतील, तर रिपोझिटरीझ सुधारणेनंतर उपलब्ध होण्यासाठी खास काळजी घ्यायला हवी. खालील प्रक्रिया Red Hat Enterprise Linux 4 प्रणालीवर, Red Hat Enterprise Linux 4.92 मध्ये सुधारित करण्यापूर्वी पाळावी:

  1. सर्व चालू असलेल्या प्रक्रिया बंद करा आणि कोणत्याही प्रक्रिया (उदाहरणार्थ, httpd, svnserve किंवा कोणताही स्थानिक उपयोक्ता ज्यास थेट परवानगी असेल)रिपॉझिटरी वापरू शकणार नाहीत याची खात्री करा.

  2. रिपॉझिटरीचा बॅकअप बनवा; उदाहरणार्थ:

    
    svnadmin dump /path/to/repository | gzip > repository-backup.gz
                                    
  3. svnadmin recover ही आज्ञा या रिपॉझिटरीवर चालवा:

    
    svnadmin recover /path/to/repository
                                    
  4. रिपॉझिटरीमधील कोणत्याही न वापरलेल्या लॉग फाइल्स काढून टाका:

    
    svnadmin list-unused-dblogs /path/to/repository | xargs rm -vf
                                    
  5. रिपॉझिटरीमधील कोणत्याही शिल्लक असलेल्या भागलेली-स्मृती फाइल्स काढून टाका:

    
    rm -f /path/to/repository/db/__db.0*
                                    

तंत्रज्ञान पूर्वदृश्ये

तंत्रज्ञान पूर्वदर्शन ही वैशिष्ट्ये समर्थनीय नाहीत, परंतु या प्रकाशनात उपलब्ध केली आहेत. त्यांची वर्णन केलेल्या कार्यशीलता तपासल्या जाऊ शकतात, तरीही, उच्च-प्राधान्यता मुद्द्यांसाठी एराटा हे तंत्रज्ञान पूर्वदर्शनासाठी पुरवलेले एकमात्र समर्थन आहे.

याच्या विकास प्रक्रियेत, तंत्रज्ञान पूर्वदर्शनाचे अतिरिक्त भाग लोकांस तपासणीसाठी उपलब्ध होऊ शकतात. यात Red Hat चा विचार आहे तंत्रज्ञान पूर्वदर्शनास येणाऱ्या लघू आणि मुख्य प्रकाशनांत पूर्ण समर्थन देण्याचा.

Stateless Linux

Red Hat Enterprise Linux 4.92 च्या बीटामध्ये समाविष्ट आहेत Stateless Linux चे इन्फ्रास्ट्रक्चर तुकडे कार्यान्वित करणे. Stateless Linux हा प्रणाली कशी चालवावी आणि व्यवस्थापित करावी यादृष्टीने विचार करण्याचा नविन मार्ग आहे, जो मोठ्या प्रमाणावरील प्रणाल्यांस सहज बदलण्यायोग्य करून त्यांचा पुरवठा आणि व्यवस्थापन सुलभ करणयासाठी रचला आहे. हे प्राथमिकतः तयार प्रणाली प्रतिमा, ज्या मोठ्या प्रमाणावरील स्थितीविहीन प्रणाल्यांमध्ये प्रतिलिपीत आणि व्यवस्थापित होतात, स्थापित करून कार्यकारी प्रणालीस फक्त-वाचन या प्रकारात सुरू करून साधले जाते.

विकासाच्या सद्यस्थितीत, स्थितीविहीन वैशिष्ट्ये अपेक्षित लक्ष्याचे उपसंच आहेत. या तऱ्हेने, या क्षमतेस तंत्रज्ञान पूर्वदृश्य असे संबोधले जात आहे.

खालील यादी Red Hat Enterprise Linux 4.92 beta मध्ये असलेल्या प्रारंभिक क्षमतांची आहे:

  • स्थितीविहीन प्रतिमा NFS वर चालवत आहे.

  • स्थितीविहीन प्रतिमा NFS वर लूपबॅक मार्फत चालवत आहे

  • iSCSI वर चालू आहे

मुख्य सेवकावरून झालेल्या बदलांसह स्थानिक फाइल प्रणालीवर Stateless Linux चालवणे, आवश्यक कर्नल बदलांमुळे सध्या शक्य नाही.

हे अत्यंत शिफारसीय आहे कि ज्यांना स्थितीविहीन कोड परिक्षणात(टेस्टींग) रस असेल त्यांनी http:// fedoraproject.org/wiki/StatelessLinuxHOWTO येथे HOWTO वाचावे आणि stateless-list@redhat.com येथे जुळावे.

GFS2

GFS2 ही GFS फाइल प्रणालीवर आधारित उत्क्रांत सुधारणा आहे. पूर्णतः कार्यशील असूनही GFS2 अजून उत्पादनास तयार मानली जात नाही. GFS जी ५ वर्षे उत्पादनात आहे, या प्रकाशात पुरवली आहे आणि गैर-क्लस्टर्ड डेटा फाइल प्रणाल्या(root आणि boot व्यतिरिक्त) तसेच क्लस्टर इन्फ्रास्ट्रक्चर हजर असताना शेअर केलेल्या संग्रहावरील क्लस्टर्ड फाइल प्रणाली व्यूहरचना यांसाठी पूर्णतः समर्थित आहे, GFS2 Red Hat Enterprise Linux 4.92 च्या आगामी अद्यतनांमध्ये पूर्णतः समर्थीत स्थितीवर नेण्यास लक्ष्य आहे. सध्या उपलब्ध उपयुक्तता आहे, gfs2_convert, जी GFS फाइल प्रणालीचा मेटाडेटा अद्ययावत करू शकते, तिला GFS2 फाइल प्रणालीमध्ये रुपांतरीत करत.

FS-Cache

FS-Cache ही दूरस्थ फाइल प्रणाल्यांसाठी स्थानिक कॅशींग सुविधा आहे; ती उपयोक्त्यांस NFS डेटा स्थानिकरित्या आरोहित डिस्कवर कॅश करण्याची सोय देते. FS-Cache सुविधा सेटअप करण्यासाठी, cachefilesd RPM प्रतिष्ठापित करा आणि /usr/share/doc/cachefilesd-<version>/README मधील सुचनांचा संदर्भ घ्या.

<version> ला प्रतिष्ठापित करावयाच्या cachefilesd संकुलाच्या संबंधित आवृत्तीने बदला.

Compiz

Compiz हा OpenGL-आधारित संयुक्त खिडकी(विन्डो) व्यवस्थापक आहे. नियमित खिडकी व्यवस्थापक असण्याव्यतिरीक्त, compiz संयुक्तन व्यवस्थापक म्हणूनही काम करू शकतो. या भुमिकेमध्ये, compiz एकूणच डेस्कटॉप चित्रण समन्वयीत आणि सिंक्रोनाइझ करतो ज्याद्वारे कमी हेलकावे आणि अधिक घन संवेदनेसह अधिक नितळ डेस्कटॉप अनुभव पुरवतो.

लाइव थंबनेल खिडक्या आणि खिडकी ड्रॉप सावल्या, तसेच एनिमेटेड खिडकी लघूकरण आणि आभासी डेस्कटॉप दरम्यान बदल यांसारखे प्रभाव पाडण्यासाठी Compiz 3D हार्डवेअर संवेगन वापरते.

सद्य रेंडरींग आर्किटेक्चरमधील मर्यादांमुळे, compiz थेट रेंडरींग OpenGL अनुप्रयोग किंवा Xv विस्तार वापरणारे अनुप्रयोग यांसह अचूक काम करू शकत नाही. असे अनुप्रयोगांत निरूपद्रवी रेंडरींग कृत्रिमता असतील; या कारणास्तव हे वैशिष्ट्य सध्या पूर्णतः समर्थित नाही.

Ext3 साठी सुधारणा

Red Hat Enterprise Linux 4.92 मध्ये, EXT3 फाइल प्रणालीची क्षमता 8TB वरून अधिकाधिक 16TB पर्यंत वाढवली आहे. ही क्षमता तंत्रज्ञान पूर्वदर्शन म्हणून समाविष्ट केली जात आहे, आणि Red Hat Enterprise Linux 4.92 च्या भावी प्रकाशनांमध्ये पूर्ण समर्थनासाठी लक्ष्य आहे.

ज्ञात मुद्दे

  • bind सुधारणा चूक: bind ची सुधारणा करताना, अशी फाइल किंवा निर्देशिका नाही ही चूक उद्भवू शकते. हे प्रतिष्ठापन मालिका त्रुटीमुळे होते, जे GA च्या आधी भेटले जाईल. यावर उपाय म्हणून, रूट म्हणून लॉगिन करा आणि /usr/sbin/bind-chroot-admin --enable (जर तुम्ही bind-chroot संकुल प्रतिष्ठापित केले असेल) किंवा /usr/sbin/bind-chroot-admin --sync (जर तुम्ही caching-nameserver संकुल प्रतिष्ठापित केले असेल) चालवा.

  • caching-nameserver सुधारणा चूक: caching-nameserver सुधारित करताना, लॉग अवैध संदर्भ चूक दाखवतो. हे selinux-policy संकुलातील अवलंबन मामल्यामुळे होते, जो GA च्या आधी भेटला जाईल. यावर उपाय म्हणून, रूट म्हणून लॉगिन करा आणि /usr/sbin/bind-chroot-admin --sync चालवा.

  • कर्नल विभाग संकुले (kmods) फक्त kABI अवलंबनांसह बांधले जाऊ शकतात जर ते अशा प्रणालीवर बांधले की जीच्यासाठी kernel-devel आणि संबंधित कर्नल संकुले प्रतिष्ठापित आहेत. म्हणून, सध्या kABI-enhanced kmods अप्रतिष्ठापित कर्नलांसाठी बांधणे शक्य नाही. ही मर्यादा GA च्या आधी भेटली जाईल.

  • MegaRAID ड्राइवर वापरणाऱ्या यजमान बस अडाप्टरांस "मोठा संग्रह" इम्यूलेशन रितीवरच निर्धारित करावे, "I2O" इम्यूलेशन रितीवर नाही. हे करण्यासाठी खालील क्रिया करा:

    1. MegaRAID BIOS Set Up उपयुक्तता दाखल करा.

    2. अडाप्टर रचना मेनू दाखल करा.

    3. इतर अडाप्टर पर्याय अंतर्गत, इम्यूलेशन निवडा आणि त्यास मुख्य संग्रह येथे नियोजित करा.

    जर अडाप्टर चुकून "I2O" इम्यूलेशनवर निर्धारित केला असेल, तर प्रणाली i2o ड्राइवर लोड करण्याचा प्रयत्न करेल. हे असफल होइल, आणि अडाप्टरला अकार्यक्षम करेल.

    Red Hat Enterprise Linux ची मागील प्रकाशने सहसा MegaRAID ड्राइवरच्या आधी I20 ड्राइवर भारित करण्याचा प्रयत्न करत नाहीत. याच्या असंबंध, हार्डवेयर कधीही Linux बरोबर वापरले जात असताना "मोठा संग्रह" इम्यूलेशन रितीवर निर्धारित केलेले नसावे.

  • ext3 / jbd कर्नल पॅनिक: भारी I/O ते फाइल प्रणाली जिथे ब्लॉक आकार पेज आकारापेक्षा लहान असल्यास jbd क्रॅश होऊ शकतो.

    या मसल्याची तपासणी होत आहे आणि तो GA मध्ये सोडवला जाईल.

  • आभासीकरण अतिथी प्रतिष्ठापन चूक: पॅरावर्ट अतिथीचे eth1 वर मुलभूत इथरनेट जोडणीसह प्रणालीवर प्रतिष्ठापन ड्राइवर सापडला नाही ही चूक दाखवते. यावर उपाय म्हणून, eth0 ला मुलभूत इथरनेट जोडणी म्हणून निर्धारित करावे.

    या मसल्याची तपासणी होत आहे आणि तो GA मध्ये सोडवला जाईल.

  • Anaconda incorrectly selects vesa driver: when Red Hat Enterprise Linux 4.92 is installed in text-only mode on a system with a geforce 5200-based video card, the vesa driver will be selected. This is incorrect, and will cause the screen to go blank once you run system-config-display. This issue will be resolved in GA.

    To work around this, open xorg.conf and change the line Driver "vesa" to Driver "nv".

  • Virtualization paravirt guest installation failure: attempting to install a paravirt guest on a system where SELinux is enabled will fail. This issue is being investigated and will be resolved in GA.

    To work around this, turn off SELinux before installing a paravirt guest.

  • Virtualization guest boot bug: when you install a fully virtualized guest configured with vcpus=2, the fully virtualized guest may take an unreasonably long time to boot up. This issue is being investigated and will be resolved in GA.

    To work around this, disable the guest ACPI by using the kernel parameters acpi=strict or acpi=static for the virtualized kernel during grub boot.

सामान्य माहिती

या विभागात सामान्य माहिती आहे जी या दस्तावेजातील कोणत्याही विशिष्ट विभागाशी निगडीत नाही.

आभासीकरण

Red Hat Enterprise Linux 4.92 मध्ये i686 आणि x86-64 साठी आभासीकरण क्षमता, तसेच आभासित पर्यावरणास व्यवस्थापित करण्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअर इन्फ्रास्ट्रक्चर यांचा समावेश होतो.

आभासीकरणाचे Red Hat Enterprise Linux 4.92 मधील अवलंबन हाइपरवाइजर वर आधारित आहे, जो अत्यंत कमी खर्चिक आभासिकरण आंशिक आभासीकरणाद्वारे सोयीस्कर करतो. Intel Virtualization Technology किंवा AMD AMD-V सक्षम प्रोसेसरांसह, Red Hat Enterprise Linux 4.92 मधील आभासीकरण फेरफार न केलेल्या ऑपरेटींग सिस्टीम्स (कार्यकारी प्रणाल्या) पूर्ण आभासीत रितीमध्ये चालवू शकतो.

Red Hat Enterprise Linux 4.92 वरील आभासीकरणामध्ये खालील विशेषता देखील आहेत:

  • Libvirt, लायब्ररी जी आभासी मशीन व्यवस्थापित करण्यासाठी सातत्यपूर्ण, पोर्टेबल API पुरवते.

  • Virtual Machine Manager, आभासी मशीनींचे निरीक्षण आणि व्यवस्थापन करण्यासाठी आलेखीय उपयुक्तता.

  • प्रतिष्ठापकामध्ये आभासी मशीन आधार, आभासी मशीनला किकस्टार्ट करण्याच्या क्षमतांसह.

Red Hat Network आभासी मशीनला देखील समर्थन देतो.

वेब सेवक संकुलन बदल

Red Hat Enterprise Linux 4.92 मध्ये आता Apache HTTP सेवकाच्या आवृत्ती 2.2 चा समावेश होतो. या प्रकाशनात 2.0 मालिकेवरील बऱ्याच सुधारणांचा समावेश होतो, ज्यात आहेत:

  • सुधारित कॅशींग विभाग(मोड्यूल्स) (mod_cache, mod_disk_cache, mod_mem_cache)

  • अधिप्रमाणन आणि अधीकृतता आधारासाठी नविन संरचना, मागील आवृत्त्यांमधील अधिप्रमाणन विभागांस बदली करून

  • प्रॉक्झी भार संतुलनास आधार (mod_proxy_balance)

  • अवाढव्य फाइल(जसे, 2GB पेक्षा मोठ्या) 32-bit प्लॅटफॉर्मवर हाताळण्यासाठी आधार

मुलभूत httpd व्यूहरचनेत खालील बदल केले गेले आहेत:

  • mod_cern_meta आणि mod_asis मोड्यूल्स यापुढे मुलभूतरित्या भारित केले जात नाहीत.

  • mod_ext_filter मोड्यूल आता मुलभूतरित्या भारित केले जाते.

जर Red Hat Enterprise Linux च्या मागील प्रकाशनापासून सुधारणा करत असाल, तर httpd व्यूहरचना httpd2.2 पासून अद्ययावत करावी लागेल. अधिक माहितीसाठी, http:// httpd.apache.org/docs/2.2/upgrading.html चा संदर्भ घ्या.

तृतीय पक्षीय मोड्यूल्स

httpd 2.0 साठी कम्पाइल केलेले कोणतेही तृतीय पक्षीय मोड्यूल्स httpd 2.2 साठी पुनःरचित करावे.

php

PHP ची आवृत्ती 5.1आता Red Hat Enterprise Linux 4.92 मध्ये समाविष्ट आहे, ज्यात भाषांमधील बऱ्याच बदलांचा कामगिरीतील लक्षणीय सुधारणांसह समावेश होतो. काही स्क्रिप्ट्सना नविन आवृत्त्यांसाठी अनुकूल करावे लागू शकते, कृपया PHP 4.3 मधून PHP 5.1 मध्ये स्थानांतरित होण्याविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकचा संदर्भ घ्या:

http://www.php.net/manual/en/migration5.php

/usr/bin/php हे चालवण्यायोग्य CGI SAPI ऐवजी CLI command-line SAPI वापरून रचली आहे. CGI SAPI साठी /usr/bin/php-cgi वापरा. php-cgi हे एक्झिक्यूटेबलमध्ये सुद्धा FastCGI आधाराचा समावेश होतो.

खालील वाढीव मोड्यूल्स जोडले गेले आहेत:

  • mysqli एक्सटेंशन, विशेषतः MySQL 4.1 साठी रचलेला एक नविन इंटरफेस. यात php-mysql संकुलाचा समावेश होतो.

  • दिनांक, हॅश, परावर्तन, SPL आणि SimpleXML (php संकुलासह बांधलेले)

  • pdo आणि pdo_psqlite (php-pdo संकुलामध्ये)

  • pdo_mysql (php-mysql संकुलामध्ये)

  • pdo_pgsql (php-pgsql संकुलामध्ये)

  • pdo_odbc (php-odbc संकुलामध्ये)

  • soap (php-soap संकुलामध्ये)

  • xmlreader आणि xmlwriter (php-xml संकुलामध्ये)

  • dom(domxml एक्सटेंशनला बदलून; php-xml संकुलामध्ये)

खालील एक्सटेंशन मोड्यूल्स यापुढे समाविष्ट केलेले जाणार नाहीत:

  • dbx

  • dio

  • yp

  • अतिभार

  • domxml

PEAR फ्रेमवर्क

PEAR फ्रेमवर्क आता php-pear संकुलात संकुलीत केले आहे. फक्त खालील PEAR घटक Red Hat Enterprise Linux 4.92 मध्ये समाविष्ट केले आहेत:

  • Archive_Tar

  • Console_Getopt

  • XML_RPC

कर्नल ABI अवलंबन तपासासह kmod कर्नल विभाग संकुले बनवणे

Red Hat Enterprise Linux 4.92 वर, अद्ययावत कर्नल संकुले जी चालू कर्नल ABI आवृत्तीवर अवलंबून आहेत आणि विशिष्ट कर्नल प्रकाशन क्रमांकावर नाही त्यांची बांधणी करणे शक्य आहे. यामुळे एकट्या प्रकाशनाऐवजी विविध Red Hat Enterprise Linux 4.92 कर्नलांसाठी कर्नल विभाग बांधणे सुलभ होते. प्रकल्पाच्या संकेतस्थळावर http://www.kerneldrivers.org/ संकुलन प्रक्रियेविषयी अधिक माहिती उदाहरणांसह उपलब्ध आहे.

एनक्रिप्टेड स्वॅप विभाजने आणि गैर-रूट फाइल प्रणाल्या

Red Hat Enterprise Linux 4.92 आता एनक्रिप्टेड स्वॅप विभाजने आणि गैर-रूट फाइल प्रणाल्या यांस मुलभूत आधार पुरवतो. ही वैशिष्ट्ये वापरण्यासाठी, /etc/crypttab मध्ये योग्य नोंदी जमा करा आणि /etc/fstab मध्ये निर्माण केलेल्या यंत्रांचा संदर्भ द्या.

खाली साधी /etc/crypttab नोंद आहे:

my_swap /dev/hdb1 /dev/urandom swap,cipher=aes-cbc-essiv:sha256
                        

हे एनक्रिप्टेड ब्लॉक यंत्र /dev/mapper/my_swap बनवते, जे /etc/fstab मध्ये संदर्भले जाऊ शकते.

खाली /etc/crypttab मध्ये फाइल प्रणाली खंडाच्या नोंदीचा नमुना आहे:

my_volume /dev/hda5 /etc/volume_key cipher=aes-cbc-essiv:sha256
                        

/etc/volume_key मध्ये पाठ स्वरूपात एनक्रिप्शन कळ आहे. तुम्ही none अशी कळ फाइलदेखील दर्शवू शकता, ज्यामुळे प्रणाली तुम्हास बूट होताना एनक्रिप्शन कळ विचारेल.

फाइल प्रणाली खंड रचण्यासाठी LUKS वापरणे शिफारसित आहे. हे करण्यासाठी खालील टप्पे पार करा:

  1. cryptsetup luksFormat वापरून एनक्रप्टेड खंड बनवा.

  2. /etc/crypttab फाइलमध्ये आवश्यक नोंद जोडा.

  3. cryptsetup luksOpen (किंवा रीबूट) वापरून खंड स्वहस्ते रचता येतो.

  4. एनक्रिप्टेड खंडावर फाइल प्रणाली बनवा.

  5. /etc/fstab मध्ये आवश्यक नोंद जोडा.

आरोहण आणि अनारोहण

mount आणि umount यापुढे NFS थेट आधार देणार नाहीत; बिल्ट-इन NFS क्लाएंट यापुढे नसेल. एक वेगळे संकुल nfs-utils, जे /sbin/mount.nfs आणि /sbin/umount.nfs पुरवतो यासाठी हेल्पर प्रतिष्ठापित असावा.

CUPS मुद्रक ब्राउसिंग

स्थानिक सबनेटवर CUPS मुद्रक ब्राउसिंग व्यूहरचना system-config-printer हे आलेखीय उपकरण वापरू शकता. हे CUPS च्या वेब इंटरफेसवर, http://localhost:631/ येथेदेखीस तपासू शकता.

सबनेट्समध्ये ब्राउसिंग करत असलेल्या मुद्रकांसाठी दिग्दर्शित ब्रॉडकास्ट वापरण्यासाठी, क्लाएंटवर /etc/cups/cupsd.conf उघडा आणि BrowseAllow @LOCAL ला BrowseAllow ALL मध्ये बदला.

आंतरराष्ट्रीयकरण

या विभागात Red Hat Enterprise Linux 4.92 च्या अंतर्गत असलेल्या भाषा आधारा विषयी माहिती समाविष्ट आहे.

आदान पद्धती

SCIM (Smart Common Input Method) ने या प्रकाशनात IIIMF ची जागा आशियायी आणि इतर भाषांसाठी आदान पद्धती म्हणून घेतली आहे. SCIM साठी मुलभूत GTK आदान पद्धती scim-bridge द्वारे पुरवली जाते; Qt मध्ये ती scim-qtimm द्वारे पुरवली जाते.

खाली विविध भाषांसाठी मुलभूत ट्रिगर हॉटकीझ आहेत:

  • सर्व भाषा: Ctrl-Space

  • जपानी: Zenkaku-Hankaku किंवा Alt-`

  • कोरिअन: Shift-Space

जर SCIM प्रतिष्ठापित असेल, तर ते सर्व उपयोक्त्यांसाठी मुलभूतरित्या चालते.

भाषा प्रतिष्ठापन

बहुतेक आशियायी प्रतिष्ठापनांसाठी SCIM मुलभूतरित्या प्रतिष्ठापित आहे. नाहीतर, तुम्ही संकुल व्यवस्थापक (pirut) वापरून "भाषा" घटकाद्वारे अतिरिक्त भाषा आधार प्रतिष्ठापित करू शकता, किंवा ही आज्ञा चालवू शकता:


su -c 'yum groupinstall <language>-support'
                        

वरील आदेशामध्ये, language असू शकते Assamese, Bengali, Chinese, Gujarati, Hindi, Japanese, Kannada, Korean, Malayalam, Marathi, Oriya, Punjabi, Sinhala, Tamil, Thai किंवा Telugu.

im-chooser

im-chooser नावाचे नविन उपयोक्ता व्यूहरचना उपकरण जोडण्यात आले आहे, जे तुम्हास तुमच्या डेस्कटॉपवरील आदान पद्धती सहज कार्यान्वित किंवा अकार्यान्वित करण्याची सोय देते. म्हणून जर तुमच्या डेस्कटॉपवर SCIM प्रतिष्ठापित असेल, पण तुम्ही तो तुमच्या डेस्कटॉपवर चालवू इच्छित नाही, तुम्ही त्यास im-chooser वापरून अकार्यान्वित करू शकता.

xinputrc

X सुरू होताना, xinput.sh आता ~/.xinput.d/ किंवा /etc/xinit/xinput.d/ मध्ये व्यूहरचना फाइली शोधण्याऐवजी ~/.xinputrc किंवा /etc/X11/xinit/xinputrc यांना स्त्रोत करते.

Firefox मध्ये Pango आधार

Red Hat Enterprise Linux 4.92 मधील Firefox रचला आहे Pango सह, जो काही लिप्यांसाठी चांगला आधार पुरवतो, जसे भारतीय तसेच काही CJK लिप्या.

Pango चा वापर अकार्यान्वित करण्यासाठी, तुमच्या पर्यावरणात MOZ_DISABLE_PANGO=1 हे Firefox प्रक्षेपित करण्यापुर्वी निर्धारित करा.

फॉन्ट्स

आता ज्या फॉन्टचा बोल्ड आकार उपलब्ध नसेल त्यासाठी सिंथेटिक एम्बोल्डनिंगला आधार उपलब्ध आहे.

चिनीसाठी नविन फॉन्ट्स जमा केले आहेत: AR PL ShanHeiSun Uni (uming.ttf) आणि AR PL ZenKai Uni (ukai.ttf). मुलभूत फॉन्ट आहे AR PL ShanHeiSun Uni, ज्यात एम्बेडेड बिटमॅप्सचा समावेश होतो. जर तुम्ही बाह्यरेखा आकार पसंत करत असाल, तर तुम्ही तुमच्या ~/.font.conf फाइलमध्ये खालील विभाग जोडू शकता:

<fontconfig>
 <match target="font">
   <test name="family" compare="eq">
     <string>AR PL ShanHeiSun Uni</string>
   </test>
   <edit name="embeddedbitmap" mode="assign">
     <bool>false</bool>
   </edit>
 </match>
</fontconfig>                                
                        

gtk2 IM submenu

Gtk2 संदर्भ मेनू IM उपमेनू यापुढे मुलभूतरित्या दिसणार नाही. तुम्ही त्यास आदेश पंक्तीवर खालील आदेश देऊन कार्यान्वित करू शकता:


gconftool-2 --type bool --set '/desktop/gnome/interface/show_input_method_menu' true
                        

CJK वर पाठ प्रतिष्ठापनासाठी आधार

CJK (चीनी, जपानी आणि केरिअन) रेंडरींग आधार ऍनाकोंडा पाठ प्रतिष्ठापनातून काढून टाकला आहे. पाठ प्रतिष्ठापन पद्धती भविष्याच्या दृष्टीने नापसंत केली जात आहे कारण, GUI प्रतिष्ठापन, VNC आणि किकस्टार्ट या पद्धती पसंत केल्या जातात.

gtk2 स्टॅक

खालील संकुले Red Hat Enterprise Linux मध्ये नापसंत आणि काढून टाकण्याच्या मार्गावर आहेत:

  • gtk+

  • gdk-pixbuf

  • glib

ही संकुले gtk2 स्टॅकच्या आवडीसाठी नापसंत केली आहेत, जो आंतरराष्ट्रीयकरण आणि फॉन्ट हाताळणीच्या दृष्टीने अधिक चांगली कार्यशीलता पुरवतो.

CJK input on console

If you need to display Chinese, Japanese, or Korean on the console, you need to setup a framebuffer. To do this, install bogl and bogl-bterm, and run bterm on the framebuffer. Note that the kernel framebuffer module depends on the graphics chipset in your machine.

कर्नल टिपा

या विभागात 2.6.9(ज्यावर Red Hat Enterprise Linux 4 आधारित आहे) आणि 2.6.18(जो Red Hat Enterprise Linux 4.92 वारस(inherit) घेईल) मधील फरक १२ जुलै, २००६ नुसार नमुद केले आहेत. अतिरिक्त वैशिष्ट्ये जी सध्या अपस्ट्रीम काम करताहेत(उदा. आभासीकरण) ती 2.6.18 किंवा 2.6.19 मध्ये दृष्टीस येतील ती येथे अधोरेखीत केलेली नाहीत. दुसऱ्या शब्दांत, ही यादी फक्त अपस्ट्रीम Linus वृक्षात आधीच काय समाविष्ट केले आहे हेच दाखवते, प्रगतीशील कार्य नव्हे. परिणामतः, ही यादी अंतिम नाही, किंवा नविन Red Hat Enterprise Linux 4.92 च्या वैशिष्ट्यांची पूर्ण यादी नाही, तरीही ती काय अपेक्षित केले जाऊ शकते याची चांगली कल्पना देते. हेही लक्षात घ्या कि हा विभाग अपस्ट्रीममधील फक्त महत्वाचे बदल निवडतो, आणि तो पूर्ण विस्ताराने नाही. यात अनेक खालच्या स्तरावरील हार्डवेअर आधारातील सुधारणा आणि यंत्र ड्राइवर माहितीचा उल्लेख नाही.

विस्तारित-तपशिलाच्या पुढील स्तराच्या दृश्यासाठी खाली चांगला स्त्रोत दिला आहे:

http://kernelnewbies.org/LinuxChanges

कामगिरी / स्केलेबिलिटी
  • Big Kernel Lock preemption (2.6.10)

  • Voluntary preemption patches (2.6.13) (Red Hat Enterprise Linux 4 मधील उपसंच)

  • futexes साठी हलका उपयोक्तास्थळ प्रायोरिटी इनहेरिटन्स (PI), वास्तव-कालीक अनुप्रयोगांसाठी (2.6.18) उपयोगी

  • नविन 'mutex' locking primitive (2.6.16)

  • उच्च रिझोल्यूशन टाइमर्स (2.6.16)

    • kernel/timer.c मध्ये अंमलीत कमी-रिझॉल्यूशन कालबाद API शी विरोधाभासी, hrtimers प्रणालीच्या व्यूहरचना आणि क्षमतेवर अवलंबून चांगला रिझॉल्यूशन आणि अचुकता पुरवतो. हे टाइमर सध्या itimers, POSIX टाइमर, nanosleep आणि precise in-kernel टाइमिंगसाठी वापरले जातात.

  • विभागीय, तत्काळ परिवर्तनीय IO नियोजक (2.6.10)

    • फक्त Red Hat Enterprise Linux 4 या बूट पर्यायाद्वारे हे बदलानुकारी होते (तेही प्रति-रांगेऐवजी प्रणाली व्यापी)

  • 4-स्तर पेज टेबलमध्ये रुपांतरण (2.6.11)

    • x86-64 ला 512G पासून 128TB स्मृतीपर्यंत वाढवण्यास अनुमती देतो

  • नविन पाईप अवलंबन(2.6.11)

    • पाइप बँडविड्थमध्ये ३०-९० % कामगिरी सुधारणा

    • वतृळीय बफर लेखकांस अडवण्याऐवजी अधिक बफरींग पुरवतो

  • "Big Kernel Semaphore": Big Kernel Lock ला semaphore मध्ये बदलतो

    • लेटन्सी(उशीर) दीर्घ ताळा काळ तोडून आणि स्वेच्छा व्यत्यय जमा करून कमी करते

  • X86 "SMP पर्याय"

    • उपलब्ध प्लॅटफॉर्मनुसार कर्नल प्रतिमा रनटाइममध्ये अनुकूल करते

    • संदर्भ: http://lwn.net/Articles/164121/

  • kernel-headers संकुल

    • glibc-kernheaders संकुलास बदली करते

    • 2.6.18 कर्नलच्या headers_install या नव्या वैशिष्ट्यासह अधिक अनुकूलता पुरवते

    • लक्षवेधी कर्नल शिर्षक-संबंधी बदल:

      • <linux/compiler.h> शिर्षक फाइल काढून टाकली, कारण ती यापुढे निरूपयोगी होती

      • _syscallX() मॅक्रो काढून टाकला; उपयोक्ता-क्षेत्राने याऐवजी C लायब्ररीमधून syscall() वापरावी

      • <asm/atomic.h> आणि <asm/bitops.h> या शिर्षक फाइल काढून टाकल्या; C कंपायलर उपयोक्ता-क्षेत्र कार्यक्रमांसाठी अधिक अनुकूल स्वतःची आण्विक फंक्शन्स पुरवतो

      • #ifdef __KERNEL__ द्वारे पूर्वी संरक्षित केलेला मजकूर आता unifdef उपकरणाद्वारे पूर्णपणे काढून टाकला आहे; जे भाग उपयोक्ता-क्षेत्रास दृश्य नसावेत ते व्याख्यीत पाहण्यासाठी __KERNEL__ ला व्याख्यीत करून

      • PAGE_SIZE मॅक्रो काही आर्किटेक्चर्समधून पेज आकारांच्या बदलांमुळे काढून टाकण्यात आला, उपयोक्ता-क्षेत्राने sysconf(_SC_PAGE_SIZE) किंवा getpagesize() वापरावे.

    • उपयोक्ता-क्षेत्रासाठी अधिक अनुकूलतेसाठी, विविध शिर्षक फाइल आणि शिर्षक गाभे काढून टाकले

सर्वसामान्य वैशिष्ट्यांची मिळवण

  • kexec आणि kdump (2.6.13)

    • netdump आता kexec आणि kdump यांद्वारे बदली केले आहे, जे वेगवान बूट-अप आणि विश्वसनीय कर्नल vmcores चिकित्सेसाठी खात्रीदायी करेल. अधिक माहीती आणि व्यूहरचना सुचनांसाठी, कृपया /usr/share/doc/kexec-tools-<version>/kexec-kdump-howto.txt चा संदर्भ घ्या (<version> ला kexec-toolsसंकुलाच्या प्रतिष्ठापित संबंधित आवृत्तीने बदला).

  • inotify (2.6.13)

    • यासाठी उपयोक्ता इंटरफेस खालील syscalls द्वारे आहे: sys_inotify_init, sys_inotify_add_watch, आणि sys_inotify_rm_watch.

  • Process Events Connector (2.6.15)

    • fork, exec, id बदल, बाहेर पडणे या सर्व प्रक्रियांच्या घटना उपयोक्त-क्षेत्रास वर्तवतो.

    • ज्या अनुप्रयोगांस या घटना उपयुक्त ठरू शकतात त्यात समावेश होतो अकाउंटींग/ ऑडिटींग (उदाहरणार्थ, ELSA), प्रणाली क्रिया मॉनिटरिंग (उदाहरणार्थ, top), सुरक्षा, आणि संसाधन व्यवस्थापन (उदाहरणार्थ, CKRM). Semantics प्रति-उपयोक्ता-नामक्षेत्र, "निर्देशिकांप्रमाणे फाइली" आणि आवृत्त्यांसह फाइल प्रणाल्या यांसारख्या वैशिष्ट्यांसाठी मुख्य भाग पुरवतात.

  • सामान्य RTC (RealTime घड्याळ) उपप्रणाली (2.6.17)

  • splice (2.6.17)

    • नविन IO पद्धती जी अनुप्रयोगांदरम्यान डेटा परिवहन करताना डेटा प्रतिलिपी करणे टाळते

    • संदर्भ: http://lwn.net/Articles/178199/

  • ब्लॉक रांग IO ट्रेसिंग आधार (blktrace): उपयोक्त्यास ब्लॉक यंत्राच्या रांगेवर होत असलेल्या कोणत्याही रहदारीस पाहू देते, जी तुमच्या डिस्क काय करत आहेत याची अत्यंत तपशीलवार आकडेवारी दाखवते (2.6.17)

फाइल प्रणाली / LVM

  • EXT3

    • ext3 खंड आरक्षण (2.6.10) (Red Hat Enterprise Linux 4 मध्ये)

    • ext3 ऑनलाइन पुनराकार पॅचेस (2.6.10) (Red Hat Enterprise Linux 4 मध्ये)

    • ext3 मधील मोठ्या inode च्या भागात विस्तृत लक्षणांस आधार: जागा वाचवतो आणि काही बाबतींत कामगिरी सुधारतो (2.6.11)

  • यंत्र मॅपर बहुपथ आधार (Red Hat Enterprise Linux 4)

  • NFSv3 आणि NFSv4 साठी ACL आधार(2.6.13)

  • NFS: तारेवरून मोठे वाचन आणि लेखन करण्यास आधार (2.6.16)

    • Linux NFS क्लाएंट आता 1MB पर्यंत परिवहनास आधार देतो.

  • FUSE (2.6.14)

    • उपयोक्ताक्षेत्र कार्यक्रमात पूर्णतः कार्यक्षम फाइल प्रणाली प्रत्यक्षात आणण्यास संमती देते

  • VFS बदल

    • "वाटलेला उपवृक्ष" पॅचेस एकत्रित केले आहेत. (2.6.15)

    • संदर्भ: http://lwn.net/Articles/159077/

  • मोठी CIFS पाने (2.6.15)

    • विविध कार्यशीलता सुधारणा तसेच केबेरॉस आणि CIFS ACL यांना आधार देतो

  • autofs4: उपयोक्ताक्षेत्र autofs ला थेट आरोहण आधार देण्यासाठी अद्ययावत (2.6.18)

  • cachefs कोर सक्रीयक (2.6.18)

सुरक्षा

  • पत्ता क्षेत्र रँडमायझेशन

    • हे पॅचेस लागू केले असताना, प्रत्येक प्रक्रियेचा स्टॅक अनिश्चित(रँडम) ठिकाणी सुरू होईल, आणि mmap() साठी वापरलेल्या स्मृतीचा आरंभ(जेथे वाटलेल्या(shared) लायब्ररीज, इतर काही गोष्टींसह जातील) देखील रँडमाइज केला जाईल(2.6.12).

  • SELinux मध्ये बहुस्तरीय सुरक्षा अवलंबन (2.6.12)

  • ऑडिट उपप्रणाली

    • प्रक्रिया-संदर्भीत गाळणीस आधार (2.6.17)

    • अधिक गाळणी नियम तुलनाकार (2.6.17)

  • TCP/UDP getpeersec: सुरक्षा-सतर्क अनुप्रयोग TCP किंवा UDP सॉकेट वापरत असलेल्या IPSec सुरक्षा मंडळाचा सुरक्षा संदर्भ मिळवण्यासाठी कार्यान्वित केला (2.6.17)

नेटवर्किंग

  • विविध TCP कंजेशन मोड्यूल्स जमा केलेत (2.6.13)

  • IPV6: Advanced API मध्ये विविध नविन sockopt / ancillary ला आधार (2.6.14)

  • IPv4/IPv6: UFO (UDP फ्रेगमेंटेशन ऑफलोड) पसरा-गोळा करा मार्ग (2.6.15)

    • UFO हे असे वैशिष्ट्य आहे कि ज्यात Linux कर्नल संजाळ स्टॅक मोठ्या UDP डेटाग्रामची IP फ्रॅगमेंटेशन कार्यक्षमता हार्डवेअरमध्ये ऑफलोड करेल. यामुळे मोठ्या UDP डेटाग्रामला MTU आकाराच्या पुंजक्यांमध्ये(पॅकेट्स) फ्रॅगमेंट करताना स्टॅकवर येणारा अतिभार(ओव्हरहेड) घटेल.

  • nf_conntrack उपप्रणाली जोडली (2.6.15)

    • अस्तित्वात असलेली netfilter मधील जोडणी शोधक उपप्रणाली फक्त ipv4 हाताळू शकते. ipv6 साठी जोडणी शोधक आधार जोडण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध होते; एकतर सर्व ipv4 जोडणी शोधक कोडची ipv6 मध्ये नक्कल करणे, किंवा (या पॅचेस मध्ये निवडलेला पर्याय) ipv4 आणि ipv6 या दोघांसही हाताळू शकेल अशा सर्वसामान्य स्तराची रचना करणे म्हणजे फक्त एकच सबप्रोटोकॉल(TCP, UDP, इ.) जोडणी शोधक सहाय्यक मोड्यूल लिहावा लागेल. प्रत्यक्षात, nf_conntrack कोणत्याही स्तर ३ प्रोटोकॉलसह काम करण्यास सक्षम आहे.

  • IPV6

    • RFC 3484 सुसंगत स्त्रोत पत्ता निवड (2.6.15)

    • राउटर पसंतींसाठी आधार जमा केला (RFC4191) (2.6.17)

    • राउटर रीचेबिलिटी प्रोबिंग जमा केली (RFC4191) (2.6.17)

  • बिनतारी अद्ययावतन

    • हार्डवेअर क्रिप्टो आणि फ्रॅगमेंटेशन ऑफलोड आधार

    • QoS (WME) आधार, "बिनतारी spy आधार"

    • संमिश्र PTK/GTK

    • CCMP/TKIP आधार आणि WE-19 HostAP आधार

    • BCM43xx बिनतारी ड्राइवर

    • ZD1211 बिनतारी ड्राइवर

    • WE-20, Wireless Extensions ची आवृत्ती 20(2.6.17)

    • हार्डवेअर-स्वतंत्र सॉफ्टवेअर MAC स्तर जोडण्यात आला, "Soft MAC" (2.6.17)

    • LEAP अधिप्रमाणन प्रकार जोडण्यात आला

  • सर्वसामान्य सेगमेंटेशन ऑफलोड जोडला आहे (GSO) (2.6.18)

    • काही बाबतींत कार्यशीलता सुधारू शकतो, तरीही तो ethtool द्वारे कार्यान्वित करावा लागतो

  • जुनी पुंजके नियंत्रणे बदलून, SELinux मध्ये नविन प्रति-पुंजका प्रवेश नियंत्रणे जमा करण्यात आली आहेत

  • कोर नेटवर्कींगमध्ये secmark आधार जोडण्यात आला आहे, जो सुरक्षा उपप्रणाल्यांस संजाळ पुंजक्यांवर सुरक्षा खुणा लावण्यास संमत करतो. (2.6.18)

  • DCCPv6 (2.6.16)

हार्डवेअर आधार जोडण्यात आला

टीप

या विभागात फक्त सर्वाधिक सर्वसामान्य गुणविशेष मुल्यांकित केले आहेत.

  • x86-64 clustered APIC आधार (2.6.10)

  • Infiniband आधार (2.6.11) (बहुतेक Red Hat Enterprise Linux 4 मध्ये)

  • हॉट प्लग

    • सर्वसामान्य स्मृती जोडा/काढा आणि स्मृती हॉटप्लगसाठी आधार फंक्शन्स जोडले (2.6.15)

  • SATA/libata सुधारणा, अतिरिक्त हार्डवेअर आधार (in Red Hat Enterprise Linux 4)

    • पुर्णतः पुन्हा काम केलेला libata त्रुटी नियंत्रक; या सर्व कामाच्या परिणामस्वरूप SATA उपप्रणाली अधिक सुदृढ बनावी जी बऱ्याच प्रकारच्या त्रुटींतून बरी होऊ शकते.

    • Native Command Queuing (NCQ), NCQ हा टॅग केलेल्या आज्ञा रांगां(queuing)चा SATA आवृत्ती आहे - एकाच ड्राइववर एकाच वेळी येऊन ठेपलेल्या अनेक I/O विनंत्या असू देण्याची क्षमता.(2.6.18)

    • हॉटप्लग आधार (2.6.18)

  • EDAC आधार (2.6.16) (Red Hat Enterprise Linux 4 मध्ये)

    • EDAC चा उद्देश आहे संगणक प्रणाली मध्ये घडणाऱ्या चुका शोधणे आणि त्यांचा अहवाल देणे हा आहे.

  • Intel(R) I/OAT DMA इंजिन साठी नविन ioatdma ड्राइवर जमा केला(2.6.18)

NUMA (Non-Uniform Memory Access) / Multi-core

  • Cpusets (2.6.12)

    • Cpusets आता CPUs आणि मेमरी नोड्सचे संच कार्यांच्या(टास्क) संचास सोपवण्याची पद्धती पुरवतो. Cpusets कार्यांची CPU आणि मेमरी स्थाने कार्याच्या फक्त सद्य cpuset मधील संसाधनांपुरते निर्बंधित करतो. हे मोठ्या प्रणाल्यांवर अस्थायी (dynamic) कामांच्या स्थानांस व्यवस्थापित करण्यासाठी आवश्यक आहे.

  • NUMA-aware slab allocator (2.6.14)

    • हे अनेक नोड्सवर स्लॅब निर्माण करते आणि स्लॅब्सना अशा प्रकारे व्यवस्थापित करते कि स्थानकांचे स्थानिकरण उत्तमोत्तम होते. प्रत्येक नोडची अपूर्ण, मुक्त आणि पूर्ण अशा स्लॅब्सची यादी असते. सर्व वस्तूं(ऑब्जेक्ट)साठी नोडचे स्थानिकरण नोड-संबंधी स्लॅब यादीद्वारे होते.

  • स्वॅप स्थानांतरण (2.6.16)

    • स्वॅप स्थानांतरण प्रक्रिया सुरू असताना NUMA प्रणालीतील नोड्स दरम्यान पानांची भौतिक जागा हलवण्यास सुकर करते.

  • अवाढव्य पाने (2.6.16)

    • अवाढव्य पानांसाठी NUMA पॉलिसी आधार जोडण्यात आला आहे: स्मृती(मेमरी) पॉलिसी स्तरामधील huge_zonelist() फंक्शन NUMA अंतराद्वारे क्रमबद्ध क्षेत्रांची(झोन) यादी पुरवते. hugetlb स्तर यादीमध्ये अवाढव्य पाने उपलब्ध असलेले परंतु तरीही सद्य cpuset च्या नोडसंचात असलेले क्षेत्र(झोन) शोधतो.

    • अवाढव्यपाने आता cpusets पाळतात.

  • प्रति-क्षेत्र VM मोजक

    • क्षेत्र-आधारित VM आकडेवारी पुरवा, जी क्षेत्र स्मृतीच्या कोणत्या अवस्थेत आहे हे ठरवण्यासाठी आवश्यक आहे

  • Netfilter ip_tables: NUMA-सतर्क स्थानिकरण. (2.6.16)

  • Multi-core

    • कोरांच्या दरम्यान वाटून घेतलेल्या कॅशेससह मल्टी-कोर दर्शवण्यासाठी नविन अनुसूचक(शेड्यूलर) डोमेन जोडली आहे. यामुळे अशा प्रणाल्यांवर हुशार cpu शेड्यूलिंग करणे शक्य होते,ज्यामुळे काही बाबतींत कामगिरीदेखील उत्तमरित्या सुधारते. (2.6.17)

    • CPU अनुसूचका(शेड्यूलर)साठी शक्ती(पॉवर) बचत पॉलिसी: multicore/smt cpus सह, शक्तीचा वापर सर्व CPUs मध्ये काम पसरवण्याऐवजी, काही संकुलांस आराम देऊन काही इतरांकडून सारे काम करवून सुधारला जाऊ शकतो.

( amd64 )



[1] हा मजकूर फक्त Open Publication License, v1.0 मध्ये उद्धृत अटी आणि शर्तींनुसार वितरित केला जाऊ शकतो, जो http://www.opencontent.org/openpub/ येथे उपलब्ध आहे.