ओळख

या दस्तावेजात खालील विषय समाविष्ट आहेत:

  • प्रतिष्ठापना संबंधी टिपा

  • तंत्रज्ञान पूर्वदृश्ये

  • ज्ञात मुद्दे

  • सामान्य माहिती

  • ड्राइवर अद्यतन कार्यक्रम

  • आंतरराष्ट्रीयकरण

  • कर्नल टिपा

Red Hat Enterprise Linux 5 वरील काही अद्यतने प्रकाशन टिपांच्या या आवृत्तीत आढळणार नाहीत. प्रकाशन टिपांची अद्यायावत आवृत्ती खालील URL वर उपलब्ध असू शकते:

http://www.redhat.com/docs/manuals/enterprise/RHEL-5-manual/index.html

प्रतिष्ठापन-संबंधी टिपा

खालील विभागात Red Hat Enterprise Linux ची प्रतिष्ठापना आणि ऍनाकोंडा प्रतिष्ठापना कार्यक्रमास विशिष्ट माहितीचा समावेश होतो.

टीप

आधीच प्रतिष्ठापित असलेल्या Red Hat Enterprise Linux यांना सुधारित करण्यासाठी, तुम्ही त्या बदललेल्या संकुलांस अद्ययावत करण्यासाठी Red Hat संजाळ चा वापर केलाच पाहिजे.

Red Hat Enterprise Linux 5 चे ताजे प्रतिष्ठापन करण्यासाठी किंवा Red Hat Enterprise Linux 4 च्या नविनतम अद्ययावत आवृत्ती पासून Red Hat Enterprise Linux 5 मध्ये सुधारणा करण्यासाठी तुम्ही Anaconda चा वापर करू शकता.

जर तुम्ही Red Hat Enterprise Linux 5 CD-ROMs मधील समाविष्टांस प्रतिलिपीत करत असाल (उदाहरणार्थ, संजाळ-आधारित प्रतिष्ठापनाची तयारी करताना) तर फक्त कार्यकारी प्रणाली(ऑपरेटींग सिस्टीम)साठीच प्रतिलिपी करण्याची खात्री असू द्या. अगाऊ CD-ROM, किंवा कोणतेही स्तरीय उत्पाद CD-ROMs प्रतिलिपी करू नका, कारण ते ऍनाकोंडा च्या योग्य कार्यास आवश्यक अशा फाइल्स गिरवून टाकेल. Red Hat Enterprise Linux प्रतिष्ठापित झाल्या नंतरच हे CD-ROMs प्रतिष्ठापित करावेत.

ISO समाविष्टे आणि नोंदणी

सॉफ्टवेयर विभाग संकुलांची संस्था उत्पाद-विशिष्ट पर्यायी रूपांमध्ये Red Hat Enterprise Linux च्या मागील आवृत्त्यांपासून बदलली आहे. विविध पर्यायी रूपे आणि ISO प्रतिमांची एकूण संख्या दोन वर आणली गेली आहे:

  • Red Hat Enterprise Linux 5 सेवक

  • Red Hat Enterprise Linux 5 क्लाएंट

ISO प्रतिमेमध्ये बऱ्याच रिपझिटरीजसाठी कोर वितरणावर अतिरिक्त कार्यशीलता पुरवणाऱ्या सॉफ्टवेयर संकुलांचा समावेश होतो, जसे आभासीकरण, क्लस्टरिंग किंवा क्लस्टर स्टोरेज. सेवक रूपे, क्लाइंट रूपे आणि उपलब्ध पर्याय यांविषयी अधिक माहितीसाठी http://www.redhat.com/rhel/ चा संदर्भ घ्या.

सारख्याच वृक्षातील किंवा ISO प्रतिमेतील पर्यायी समाविष्टांसह, प्रतिष्ठापनासाठी पुरवलेले घटक आणि सभासदत्वात समाविष्ट घटक यांतील विजोडता टाळणे आवश्यक आहे. अशी विजोडता त्रुटी किंवा मर्मभेदी जोखीम यांस कारणीभूत होऊ शकते.

पुरवलेले घटक सभासदत्वाशी जुळणारे असल्याची खात्री करण्यासाठी, Red Hat Enterprise Linux 5 ला प्रतिष्ठापन क्रमांक जो प्रतिष्ठापकास योग्य संकुल संच पुरवण्यास रचण्यासाठी वापरला जाईल तो दाखल करणे आवश्यक आहे. प्रतिष्ठापन क्रमांक तुमच्या सभासदत्वात समाविष्ट आहे.

जर तुम्ही प्रतिष्ठापन क्रमांक दाखल करणे टाळले, तर कोर सेवक किंवा डेस्कटॉप प्रतिष्ठापन होईल. अतिरिक्त कार्यशीलता नंतर स्वहस्ते जोडता येऊ शकतात. प्रतिष्ठापन क्रमांकांविषयी अधिक माहितीसाठी http://www.redhat.com/apps/support/in.html चा संदर्भ घ्या.

प्रतिष्ठापनादरम्यान वापरलेला प्रतिष्ठापन क्रमांक /etc/sysconfig/rhn/install-num या फाइलमध्ये सुरक्षित केला जाईल. Red Hat संजाळ वर नोंदणी करताना, ही फाइल rhn_register द्वारे तुमची प्रणाली कोणत्या योग्य बालक वाहिनीस नोंदवावी हे आपोआप निश्चित करण्यासाठी संदर्भिली जाईल.

नविन RPM GPG स्वाक्षरी कळा

Red Hat Enterprise Linux 5 संकुले साक्षांकित करण्यासाठी नविन प्रकाशन स्वाक्षरी कळ वापरली आहे. प्रणाली प्रथमच अद्ययावत करताना, तुम्हास ही कळ प्रतिष्ठापित करण्यास सुचवले जाईल.

स्वाक्षरी कळा खालील ओळींत वितरित केल्या आहेत:

  • /etc/pki/rpm-gpg/RPM-GPG-KEY-redhat-release — मध्ये नविन प्रकाशन स्वाक्षरी कळसाठी सार्वजनिक कळ समाविष्ट आहे

  • /etc/pki/rpm-gpg/RPM-GPG-KEY-redhat-auxiliary — मध्ये सहाय्यक प्रकाशन स्वाक्षरी कळसाठी सार्वजनिक कळ समाविष्ट आहे, जी सध्या वापरणीत नाही

  • /etc/pki/rpm-gpg/RPM-GPG-KEY-redhat-former — मध्ये मागील प्रकाशन स्वाक्षरी कळसाठी सार्वजनिक कळ समाविष्ट आहे, जी मागील Red Hat Enterprise Linux प्रकाशनांसाठी वापरली आहे

उपः आवृत्ती

Red Hat Enterprise Linux 5 मध्ये, Subversion आवृत्ती नियंत्रण प्रणाली Berkeley DB 4.3 विरूद्ध जोडली आहे. जर Red Hat Enterprise Linux 4 पासून सुधारणा करत असाल आणि Subversion रिपोझिटरीझ ज्या Berkeley DB बॅकएंड "BDB" (शुद्ध फाइल प्रणाली आधारित "FSFS" बॅकएंडऐवजी) वापरतात, प्रणालीवर निर्माण केल्या असतील, तर रिपोझिटरीझ सुधारणेनंतर उपलब्ध होण्यासाठी खास काळजी घ्यायला हवी. खालील प्रक्रिया Red Hat Enterprise Linux 4 प्रणालीवर, Red Hat Enterprise Linux 5 मध्ये सुधारित करण्यापूर्वी पाळावी:

  1. सर्व चालू असलेल्या प्रक्रिया बंद करा आणि कोणत्याही प्रक्रिया (उदाहरणार्थ, httpd, svnserve किंवा कोणताही स्थानिक उपयोक्ता ज्यास थेट परवानगी असेल) रिपॉझिटरी वापरू शकणार नाहीत याची खात्री करा.

  2. खालील आदेश वापरून रिपॉझिटरीचा बॅकअप बनवा:

    svnadmin dump /path/to/repository | gzip 
    > repository-backup.gz
    
  3. svnadmin recover ही आज्ञा या रिपॉझिटरीवर चालवा:

    svnadmin recover /path/to/repository
    
  4. रिपॉझिटरीमधील कोणत्याही न वापरलेल्या लॉग फाइल्स काढून टाका:

    svnadmin list-unused-dblogs /path/to/repository | xargs rm -vf
    
  5. रिपॉझिटरीमधील कोणत्याही शिल्लक असलेल्या भागलेली-स्मृती फाइल्स काढून टाका:

    rm -f /path/to/repository/db/__db.0*
    

इतर प्रतिष्ठापन टिपा

  • जर IDE/PATA (Parallel ATA) यंत्रे "१००% स्थानिक" रितीमध्ये व्यूहरचित केल्यास, काही BIOS Red Hat Enterprise Linux 5 चे प्रतिष्ठापन यशस्वीरित्या पूर्ण होण्यास बाधा करू शकते. हे होण्यापासून रोखण्यासाठी, IDE/PATA रीत BIOS मध्ये "प्राचिन" म्हणून व्यूहरचित करा.

  • IBM System z पारंपारिक Unix-शैलीचा भौतिक कन्सोल पुरवत नाही. यामुळे, IBM System z साठी Red Hat Enterprise Linux 5 प्रारंभिक कार्यक्रम भारणावेळी firstboot कार्यशीलता समर्थित करत नाही.

    IBM System z वर Red Hat Enterprise Linux 5 योग्यरित्या व्यवस्थित करण्यासाठी, प्रतिष्ठापनेनंतर खालील आदेश चालवा:

    • /usr/bin/setupsetuptool संकुलाद्वारे पुरवलेले

    • /usr/bin/rhn_registerrhn-setup संकुलाद्वारे पुरवलेले

  • ऍनाकोंडा PXE सह ksdevice=bootif पॅरामीटर वापरून बूट करताना, तुम्हास तरीही प्रतिष्ठापनेदरम्यान प्रॉम्प्ट केले जाईल वापरावयाच्या इथरनेट यंत्रासाठी. जर फक्त एक इथरनेट यंत्र प्लग केले असेल, तर ऐवजी ksdevice=link पॅरामीटर वापरा. विकल्पाने तुम्ही इंटरफेसदेखील स्वहस्ते दर्शवू शकता.

तंत्रज्ञान पूर्वदृश्ये

तंत्रज्ञान पूर्वदर्शन वैशिष्ट्ये सध्या Red Hat Enterprise Linux 5 च्या सभासदत्वात समर्थित नाहीत, ती कार्यशीलतेच्या दृष्टीने पूर्ण नसावित, आणि सामान्यतः उत्पादन वापरासाठी योग्य नाहीत. तरीही, ही वैशिष्ट्ये ग्राहकाच्या सोयीसाठी आणि वैशिष्ट्यास विस्तीर्ण प्रदर्शनासह पुरवण्यासाठी समाविष्ट केली आहेत.

ग्राहकांसाठी ही वैशिष्ट्ये गैर-उत्पादन पर्यावरणात उपयुक्त ठरू शकतात. ग्राहक तंत्रज्ञान पूर्वदर्शन वैशिष्ट्यांसाठी ते पूर्णतः समर्थित होण्याआधी प्रतिसाद आणि कार्यशीलता सुचना देण्यासदेखील मुक्त आहेत. अतिउपद्रवी सुरक्षा मामल्यांसाठी एराटा पुरवले जातील.

तंत्रज्ञान पूर्वदर्शन वैशिष्ट्याच्या विकास प्रक्रियेत, अतिरिक्त घटक लोकांस तपासणीसाठी उपलब्ध होऊ शकतात. यात Red Hat चा विचार आहे तंत्रज्ञान पूर्वदर्शना वैशिष्ट्यांस भावी प्रकाशनांत पूर्ण समर्थन देण्याचा.

Stateless Linux

Red Hat Enterprise Linux 5 च्या या प्रकाशनात समाविष्ट आहेत Stateless Linux चे इन्फ्रास्ट्रक्चर तुकडे कार्यान्वित करणे. Stateless Linux हा प्रणाली कशी चालवावी आणि व्यवस्थापित करावी यादृष्टीने विचार करण्याचा नविन मार्ग आहे, जो मोठ्या प्रमाणावरील प्रणाल्यांस सहज बदलण्यायोग्य करून त्यांचा पुरवठा आणि व्यवस्थापन सुलभ करण्यासाठी रचला आहे. हे प्राथमिकतः तयार प्रणाली प्रतिमा, ज्या मोठ्या प्रमाणावरील स्थितीविहीन प्रणाल्यांमध्ये प्रतिलिपीत आणि व्यवस्थापित होतात, स्थापित करून कार्यकारी प्रणालीस फक्त-वाचन या प्रकारात सुरू करून साधले जाते (कृपया अधिक माहितीसाठी /etc/sysconfig/readonly-root चा संदर्भ घ्या).

विकासाच्या सद्यस्थितीत, स्थितीविहीन वैशिष्ट्ये अपेक्षित लक्ष्याचे उपसंच आहेत. या तऱ्हेने, या क्षमतेस तंत्रज्ञान पूर्वदृश्य असे संबोधले जात आहे.

खालील यादी Red Hat Enterprise Linux 5 मध्ये असलेल्या प्रारंभिक क्षमतांची आहे:

  • stateless प्रतिमा NFS वर चालवणे

  • स्थितीविहीन प्रतिमा NFS वर लूपबॅक मार्फत चालवणे

  • iSCSI वर चालवणे

हे अत्यंत शिफारसीय आहे कि ज्यांना स्थितीविहीन कोड परिक्षणात(टेस्टींग) रस असेल त्यांनी http:// fedoraproject.org/wiki/StatelessLinuxHOWTO येथे HOWTO वाचावे आणि stateless-list@redhat.com येथे जुळावे.

GFS2

GFS2 ही GFS फाइल प्रणालीवर आधारित उत्क्रांत सुधारणा आहे. पूर्णतः कार्यशील असूनही GFS2 अजून उत्पादनास तयार मानली जात नाही. GFS2 Red Hat Enterprise Linux 5 च्या आगामी अद्यतनांमध्ये पूर्णतः समर्थीत स्थितीवर नेण्यास लक्ष्य आहे. सध्या उपलब्ध उपयुक्तता आहे, gfs2_convert, जी GFS फाइल प्रणालीचा मेटाडेटा अद्ययावत करू शकते, तिला GFS2 फाइल प्रणालीमध्ये रुपांतरीत करते.

FS-Cache

FS-Cache ही दूरस्थ फाइल प्रणाल्यांसाठी स्थानिक कॅशींग सुविधा आहे; ती उपयोक्त्यांस NFS डेटा स्थानिकरित्या आरोहित डिस्कवर कॅश करण्याची सोय देते. FS-Cache सुविधा सेटअप करण्यासाठी, cachefilesd RPM प्रतिष्ठापित करा आणि /usr/share/doc/cachefilesd-<version>/README मधील सुचनांचा संदर्भ घ्या.

<version> ला प्रतिष्ठापित करावयाच्या cachefilesd संकुलाच्या संबंधित आवृत्तीने बदला.

कॉम्पीज

Compiz हा OpenGL-आधारित संयुक्तन खिडकी(विन्डो) व्यवस्थापक आहे. नियमित खिडकी व्यवस्थापक असण्याव्यतिरीक्त, compiz संयुक्तन व्यवस्थापक म्हणूनही काम करू शकतो, जो एकूणच डेस्कटॉप पुनःचित्रण समन्वयीत आणि सिंक्रोनाइझ करतो ज्याद्वारे कमी हेलकावे आणि अधिक नितळ डेस्कटॉप अनुभव पुरवतो.

लाइव थंबनेल खिडक्या आणि खिडकी ड्रॉप सावल्या, तसेच एनिमेटेड खिडकी लघूकरण आणि आभासी डेस्कटॉप दरम्यान बदल यांसारखे प्रभाव पाडण्यासाठी Compiz 3D हार्डवेअर संवेगन वापरते.

सद्य रेंडरींग आर्किटेक्चरमधील मर्यादांमुळे, compiz थेट रेंडरींग OpenGL अनुप्रयोग किंवा Xv विस्तार वापरणारे अनुप्रयोग यांसह अचूक काम करू शकत नाही. अशा अनुप्रयोगांत निरूपद्रवी रेंडरींग कृत्रिमता असतील; या कारणास्तव compiz सध्या पूर्णतः समर्थित नाही.

Ext3 साठी सुधारणा

Red Hat Enterprise Linux 5 मध्ये, EXT3 फाइल प्रणालीची क्षमता 8TB वरून अधिकाधिक 16TB पर्यंत वाढवली आहे. ही क्षमता तंत्रज्ञान पूर्वदर्शन म्हणून समाविष्ट केली जात आहे, आणि Red Hat Enterprise Linux 5 च्या भावी प्रकाशनांमध्ये पूर्ण समर्थनासाठी लक्ष्य आहे.

AIGLX

AIGLX हे एरवी पूर्णतः समर्थित X सेवकाचे तंत्रज्ञान पूर्वदर्शन वैशिष्ट्य आहे. हे मानक डेस्कटॉपवर GL-संवेगीत प्रभाव देण्यावर लक्ष देते. प्रकल्पात खालील बाबींचा समावेश होतो:

  • हलकेच बदललेला X सेवक

  • अद्ययावत Mesa संकुल जे नविन प्रोटोकॉल समर्थन जमा करते

हे घटक प्रतिष्ठापित केल्याने, तुम्हास खूप कमी बदलांसह GL-संवेगीत प्रभाव तुमच्या डेस्कटॉपवर मिळू शकतात, तसेच त्यांना तुमचा X सेवक बदली न करता कार्यान्वित किंवा अकार्यान्वित करण्याची क्षमता मिळेल. AIGLX हार्डवेयर GLX संवेगाचा लाभ घेण्यासाठी दूरस्थ GLX अनुप्रयोगदेखील कार्यान्वित करतो.

Frysk GUI

frysk प्रकल्पाचे लक्ष आहे एक बुद्धीमान, वितरित, नेहमी चालू राहील असे प्रणाली निरीक्षण आणि त्रुटीनिवारण उपकरण बनवणे जे विकासक आणि प्रणाली प्रशासकांस संमत करेल:

  • चालू प्रक्रीया आणि थ्रेड्सचे (निर्मिती आणि नाश घटनांसह) निरीक्षण करणे

  • लॉकींग प्रिमिटीव्सचे निरीक्षण करणे

  • डेडलॉक्स उघड करणे

  • माहिती गोळा करणे

  • कोणत्याही दिलेल्या प्रक्रीयेवर तिला यादीमधून निवडून किंवा frysk ला स्त्रोत कोड (किंवा इतर) खिडकी क्रॅश होणाऱ्या किंवा गैरवर्तन करणाऱ्या प्रक्रीयेवर उघडून त्रुटीनिवारण करणे

Red Hat Enterprise Linux 5 मध्ये frysk आलेखीय उपयोक्ता इंटरफेस तंत्रज्ञान पूर्वदर्शन आहे, मात्र frysk आदेश पंक्ती इंटरफेस पूर्णतः समर्थित आहे.

Systemtap

Systemtap Linux प्रणाली चालवण्याविषयी माहिती गोळा करणे सोपे करण्यासाठी मुक्त सॉफ्टवेयर (GPL) इन्फ्रास्ट्रक्चर पुरवते. हे कामगिरी किंवा कार्यशीलता समस्येचे निदान करण्यात मदत करते. systemtap च्या मदतीने, विकासकांस माहिती गोळा करण्यासाठी यापुढे कष्टदायी आणि खीळ बसवणाऱ्या इंस्ट्रूमेंट, रीकंपाइल, प्रतिष्ठापन आणि रीबूट या मालिकेतून जावे लागणार नाही.

Dogtail

Dogtail हे Python मध्ये लिहीलेले GUI तपासणी उपकरण आणि ऑटोमेशन फ्रेमवर्क आहे जे सुलभता तंत्रांचा वापर डेस्कटॉप अनुप्रयोगांशी संवाद करण्यासाठी करते.

भारतीय भाषा आणि सिंहलीसाठी समर्थन

Red Hat Enterprise Linux 5 खालील भाषांसाठीदेखील तंत्रज्ञान पूर्वदर्शन म्हणून समर्थन पुरवतो:

  • आसामी

  • कन्नड

  • सिंहली

  • तेलुगु

या भाषांसाठी आधार प्रतिष्ठापित आणि कार्यान्वित कसा करावा याविषयी अधिक माहितीसाठी, या दस्तावेजाच्या आंतरराष्ट्रीयकरण विभागाचा संदर्भ घ्या.

dm-multipath यंत्रांवर प्रतिष्ठापित करणे

ऍनाकोंडास आता dm-multipath यंत्रे शोधणे, निर्माण करणे, आणि प्रतिष्ठापित करणे या क्षमता आहेत. हे वैशिष्ट्य कार्यान्वित करण्यासाठी, mpath पॅरामीटर कर्नल बूट ओळीवर टाका.

नोंद करा की जर यंत्राचा major:minor क्रमांक बदलला तर mpath पॅरामीटर बूट अपयशास कारण ठरू शकते. या समस्येकडे Red Hat Enterprise Linux 5 च्या भावी अद्यतनामध्ये लक्ष देण्यात येईल.

प्रतिष्ठापन / iSCSI सॉफ्टवेयर आरंभकासाठी बूट (open-iscsi)

ऍनाकोंडा आता iSCSI यंत्र प्रतिष्ठापित करण्याची क्षमता पुरवतो. बूटींग आणि प्रतिष्ठापन QLogic qla4xxx हार्डवेयर आरंभकाद्वारे पूर्णतः समर्थित आहे. तरीही, iSCSI यंत्रावर open-iscsi सॉफ्टवेयर आरंभकासाठी प्रतिष्ठापित करण्याची क्षमता सध्या तंत्रज्ञान पूर्वदर्शनात मानली जाते, खालील मुद्द्यांमुळे:

  • पाठ रीत प्रतिष्ठापन पूर्ण होत नाही. तुम्ही आलेखीय प्रतिष्ठापन, किंवा स्वयंचलित किकस्टार्ट करायलाच हवे.

  • माध्यम-आधारित प्रतिष्ठापन पूर्ण होत नाही. तुम्ही संजाळ-आधारित प्रतिष्ठापन करायलाच हवे.

  • घटनांच्या वेळेनुसार, ऍनाकोंडा सर्व iSCSI लक्ष्ये किंवा LUNs शोधण्यास असमर्थ असू शकतो. जेव्हा हे होते, प्रतिष्ठापक शेल वापरा संग्रह iSCSI आदेशांद्वारे व्यूहरचित करण्यासाठी.

  • iscsid डीमन शक्यतो व्यवस्थित सुरू होणार नाही. अशी घटना प्रणालीस सर्व iSCSI चुका हाताळण्यापासून रोखू शकते, जसे संजाळ समस्या, SCSI/iSCSI कालबाद, आणि लक्ष्य चुका. iscsid डीमन चालू असल्याची खात्री करण्यासाठी, iscsiadm -m session -i आदेश चालवा आणि Internal iscsid Session State: ओळ मुल्य परत करत असल्याची खात्री करा (हे कोणतेही मुल्य असू शकते).

  • विशिष्ट iSCSI लक्ष्य अवलंबनांमध्ये, प्रणाली शटडाउन दरम्यान स्थगित होऊ शकते.

  • विशिष्ट iSCSI लक्ष्य अवलंबनांमध्ये, प्रणाली रिबूट दरम्यान स्थगित होऊ शकते. हे टाळण्यासाठी, प्रणाली शटडाउन करा आणि पुन्हा बूट करा (सत्रामधून थेट रीबूट करण्याऐवजी).

  • iSCSI यंत्रावरून IBM System p वर बूट करणे विश्वसनीयरित्या काम करत नाही. iSCSI यंत्रावरील प्रतिष्ठापन यशस्वी दिसूनही, परिणामी प्रतिष्ठापन व्यवस्थित बूट होणार नाही.

  • प्रतिष्ठापनानंतर पहिल्या बूटवेळी, तुम्हास खालीलप्रमाणे SELinux चुका मिळू शकतात:

    kernel: audit(1169664832.270:4): avc:  denied  { read
    } for  pid=1964 comm="iscsid" 
    

    यावर उपाय म्हणून, प्रणालीस कर्नल पॅरामीटर enforcing=0 सह बूट करा. एकदा प्रणाली व्यवस्थितरित्या बूट झाल्यावर, setenforce 1 आदेश वापरा एनफोर्सींग रीत पुनःरक्षित करण्यासाठी.

या मर्यादा Red Hat Enterprise Linux 5 भावी अद्यतनांमध्ये लक्षात घेतल्या जातील.

ज्ञात मुद्दे

  • MegaRAID ड्राइवर वापरणाऱ्या यजमान बस अडाप्टरांस "मोठा संग्रह" इम्यूलेशन रितीवरच निर्धारित करावे, "I2O" इम्यूलेशन रितीवर नाही. हे करण्यासाठी खालील क्रिया करा:

    1. MegaRAID BIOS Set Up उपयुक्तता दाखल करा.

    2. अडाप्टर रचना मेनू दाखल करा.

    3. इतर अडाप्टर पर्याय अंतर्गत, इम्यूलेशन निवडा आणि त्यास मुख्य संग्रह येथे नियोजित करा.

    जर अडाप्टर चुकून "I2O" इम्यूलेशनवर निर्धारित केला असेल, तर प्रणाली i2o ड्राइवर लोड करण्याचा प्रयत्न करेल. हे असफल होईल, आणि योग्य ड्राइवर भारित होण्यापासून रोखेल.

    Red Hat Enterprise Linux ची मागील प्रकाशने सहसा MegaRAID ड्राइवरच्या आधी I20 ड्राइवर भारित करण्याचा प्रयत्न करत नाहीत. याच्या असंबंध, हार्डवेयर कधीही Linux बरोबर वापरले जात असताना "मोठा संग्रह" इम्यूलेशन रितीवर निर्धारित केलेले असावे.

  • जेव्हा तुम्ही vcpus=2 सह व्यूहरचित पूर्णतः आभासित अतिथी प्रतिष्ठापित करता, पूर्णतः आभासित अतिथी बूट होण्यास अवास्तवरित्या जास्त वेळ शकतो.

    यावर उपाय म्हणून, हळू-बूट होणारा अतिथी xm destroy <guest id> वापरून नष्ट करा आणि xm create <guest id> वापरा तोच अतिथी नंतर पुन्हा सुरू करण्यासाठी.

  • Red Hat Enterprise Linux 5 मध्ये openmpi-1.1.1-4.el5 चा ( OFED 1.1 वितरणापासून) समावेश होतो, ज्याने अखेरीस पूर्णतः काम करणे सोडल्याचे लक्षात आले आहे. हे openmpi स्टॅक काही अनिश्चित वेळापर्यंत अपेक्षेप्रमाणे चालल्यानंतर होते.

    openmpi च्या अद्ययावत आवृत्तीसाठी, कृपया http://people.redhat.com/dledford/Infiniband/openmpi तपासा

  • Windows Server 2003 पूर्णतः आभासित Red Hat Enterprise Linux 5 प्रणालीवर अतिथी म्हणून प्रतिष्ठापित करणे प्रतिष्ठापनाच्या पहिल्या टप्प्यानंतर अनपेक्षितरित्या संपते. जेव्हा हे घडते, आलेखीय कन्सोल खिडकी बंद होते, आणि अतिथी आभासी मशीन व्यवस्थापकाच्या मशीन यादीमधून अदृश्य होते, ज्यामुळे भंगीत पाइप चूक उद्भवते.

    ही समस्या Red Hat Enterprise Linux 5 येणाऱ्या अद्यतनामध्ये सोडवली जाईल. यावर उपाय म्हणून, टर्मिनलवर खालील आदेश वापरा:

    xm create /etc/xen/<name of guest machine>

    नंतर, आभासी मशीन उघडा.

  • पूर्णतः आभासित Windows Server 2003 CD / DVD पासून निर्माण करण्याचा प्रयत्न करताना, अतिथी प्रतिष्ठापनाचा दूसरा टप्पा रीबूट केल्यानंतर चालणार नाही.

    यावर उपाय म्हणून, /etc/xen/<name of guest machine> योग्यरित्या CD / DVD यंत्रासाठी नोंद दाखल जोडून संपादा.

    जर साध्या फाइलवर प्रतिष्ठान आभासी यंत्र म्हणून वापरले असल्यास, /etc/xen/<name of guest machine> ची disk ओळ खालीलप्रमाणे दिसेल:

    disk = [ 'file:/PATH-OF-SIMPLE-FILE,hda,w']
    

    यजमानावर /dev/dvd म्हणून स्थित DVD-ROM यंत्र प्रतिष्ठापनाच्या टप्पा २ साठी 'phy:/dev/dvd,hdc:cdrom,r' सारखी नोंद दाखल करून hdc म्हणून उपलब्ध करून दिले जाऊ शकते. यामुळे, disk ओळ आता खालीलप्रमाणे दिसेल:

    disk = [ 'file:/opt/win2003-sp1-20061107,hda,w', 'phy:/dev/dvd,hdc:cdrom,r']
    

    तंतोतंत यंत्र मार्ग तुमच्या होर्डवेयरवर अवलंबून बदलू शकतात.

  • rmmod xennet मुळे domU क्रॅश होते; हे आभासीकरण वैशिष्ट्यामधील ग्रांट टेबल मामल्यामुळे होते. आभासीकरण वैशिष्ट्याच्या ग्रांट टेबल क्रिया असिंक्रोनसरित्या सोडण्याच्या सद्य अक्षमतेमुळे, xennet मॉड्यूल अतिथीमध्ये सोडणे असुरक्षित आहे. अशा प्रसंगी, ग्रांट टेबल बॅकएंड-फ्रंटएंड संवादासाठी वापरले जातात, आणि बॅकएंडने संदर्भ सोडण्याची खाही खात्री नाही, ज्यामुळे न टाळता येणारी स्मृती गळती होईल.

    ही समस्या Red Hat Enterprise Linux 5. च्या पुढील लघू प्रकाशनात सोडवली जाईल. या घडीला, उपयोक्त्यांत अतिथींमध्ये xennet मॉड्यूल अभारित न करण्याचा सल्ला देण्यात येतोय.

  • ethtool eth0 चालवल्याने इथरनेट कार्ड रचनांविषयी अपूर्ण माहिती प्रदान होते. हे फक्त आभासी कर्नल चालवणाऱ्या प्रणालींमध्ये होते, कारण आभासीकरण वैशिष्ट्य संजाळन व्यवस्था वापरते जिथे भौतिक इथरनेट यंत्र peth0 म्हणून ओळखले जाते. यास्तव, भौतिक इथरनेट कार्डाविषयी माहिती काढण्यासाठी योग्य आदेश आहे ethtool peth0.

  • आभासीकरण वैशिष्ट्य प्रतिष्ठापित करणे नमुना क्रमांक xw9300 आणि xw9400 च्या HP प्रणाल्यांवर time went backwards या सुचनेस कारणीभूत होऊ शकते.

    या समस्येवर xw9400 मशीनींवर उपाय म्हणून, BIOS रचनांस HPET टाइमर कार्यान्वित करण्यास व्युहरचित करा. नोंद करा की हा पर्याय xw9300 मशीनींवर उपलब्ध नाही.

    HP xw9300 आणि xw9400 उपयोक्त्यांस नविन BIOS प्रतिमा उपलब्ध झाल्यावर कळवेल.

  • Red Hat Enterprise Linux 5 nVidia CK804 चिपसेट प्रतिष्ठापित असलेल्या मशीनवर वापरताना, तुम्हास खालीलप्रमाणे कर्नल संदेश मिळू शकतात:

    kernel: assign_interrupt_mode Found MSI सुस्तिथी
    kernel: pcie_portdrv_probe->Dev[005d:10de] मध्ये अवैध IRQ. BIOS विक्रेत्याशी तपासनी करा
    

    हे संदेश दर्शवतात की विशिष्ट PCI-E पोर्ट IRQs ची विनंती नाही करत आहेत. पुढे, हे संदेश कोणत्याही प्रकारे मशीनच्या कामावर दुष्परिणाम करत नाहीत.

  • काही Cisco Aironet बिनतारी यंत्रे NetworkManager ला SSID ब्रॉडकास्ट न करणाऱ्या बिनतारी संजाळासाठी जोडणी तपशील संग्रहू देत नाही. हे Cisco Aironet बिनतारी यंत्राच्या फर्मवेयर मर्यादेमुळे होते.

  • Cisco Aironet MPI-350 बिनतारी कार्ड असलेले लॅपटॉप तारेवरील इथरनेट पोर्ट वापरून एखादे संजाळ-आधारित प्रतिष्ठापन करण्यादरम्यान DHCP पत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात हँग होऊ शकतात.

    यावर उपाय म्हणून, प्रतिष्ठापनेसाठी तुमचे स्थानिक माध्यम वापरा. वैकल्पिकरित्या, तुम्ही बिनतारी कार्ड प्रतिष्ठापनेपूर्वी लॅपटॉप BIOS मध्ये अकार्यान्वित करू शकता (प्रतिष्ठापनेनंतर तुम्ही बिनतारी कार्ड पुन्हा कार्यान्वित करू शकता).

  • सध्या, system-config-kickstart संकुल निवड किंवा नापसंती समर्थित नाही. system-config-kickstart वापरत असताना, संकुल निवड पर्याय तो अकार्यान्वित असल्याचे दर्शवतो. याचे कारण system-config-kickstart समुह माहिती गोळा करण्यासाठी yum चा वापर करतो, परंतु yum ला Red Hat संजाळ शी जोडण्यासाठी व्यूहरचित करण्यास तो असमर्थ आहे.

    ही समस्येचे सध्या Red Hat Enterprise Linux5 च्या पुढील लघू प्रकाशनात समाधानासाठी अन्वेषण केले जात आहे. या घडीला, तुम्हास तुमच्या किकस्टार्ट फाइलींमधील संकुल विभाग स्वहस्ते बदलावे लागतील. किकस्टार्ट फाइल उघडण्यासाठी system-config-kickstart वापरताना, ते त्यातील सर्व संकुल माहिती प्रतिरक्षित करेल आणि तुम्ही सुरक्षित केल्यावर ते लिहून ठेवेल.

  • SATA नियंत्रक असलेल्या प्रणाल्या बूट प्रक्रीयेत खालील चूक संदेश दाखवून स्तब्ध होऊ शकतात:

    ata2: पोर्ट प्रतीक्रिया हुळवारीत्या देतो, कृपया धीर धारावा
    

    नंतर, खालील चूक संदेश दिसतो:

    ata2: पुनः सुरू होतेवेळी अपयश, पुढे अकार्यक्षम होईल
    

    नोंद करा दुसऱ्या चूक संदेशानंतर, प्रणाली सामान्य बूट प्रक्रीया सुरू करेल. विलंबाव्यतिरिक्त, प्रणालीवर कोणतीही विपरीत परिणाम होत नाही, जोवर SATA ड्राइवर्स भौतिकरित्या उपस्थित आहेत ते व्यवस्थित शोधले जातील.

  • 4-socket AMD Sun Blade X8400 Server Module प्रणाली जिला node 0 मध्ये स्मृती व्यूहरचित नाही बूट होताना पॅनिक होईल. कर्नल पॅनिक होण्यापासून रोखण्यासाठी प्रणाल्या स्मृती node 0 मध्ये व्यूहरचित केलेल्या असाव्यात.

  • LVM मिरर यंत्रांवर ऍनाकोंडाद्वारे प्रतिष्ठापित करणे सध्या समर्थित नाही. ही क्षमता Red Hat Enterprise Linux 5 च्या भावी अद्यतनामध्ये जोडण्यात येईल.

  • Red Hat Enterprise Linux 5 ला Red Hat Enterprise Linux ISO प्रतिमा असलेल्या NFS सेवकावरील निर्देशिकेतून प्रतिष्ठापित करताना, ऍनाकोंडा खालील चूक संदेश दाखवू शकतो:

    संकुल मेटाडेटा वाचण्यास असमर्थ. हे हरवलेल्या repodata निर्देशिकेमुळे असू शकते. 
    कृपया तुमचा प्रतिष्ठापन वृक्ष योग्यरित्या उत्पन्न झाल्याची खात्री करा. repomd.xml 
    फाइल उघडू/वाचू शकत नाही रिपॉझिटरीसाठी:
    

    ISO प्रतिमा असलेल्या निर्देशिकेत अंशतः अनपॅक केलेला प्रतिष्ठापना वृक्षदेखील (उदाहरणार्थ, पहिल्या ISO मधील /images निर्देशिका) असल्यास सुद्धा ही समस्या उद्भवते. अशा निर्देशिकांची उपस्थितीची परिणीती वर विधित चूकीमध्ये होते.

    ही चूक वाचवण्यासाठी, वृक्षांस प्रतिष्ठापन ISO प्रतिमा असलेल्या निर्देशिकांव्यतिरिक्त ठिकाणी अनपॅक करा.

  • /var/log/boot.log फाइलमध्ये बूट-प्रसंगी प्रवेश Red Hat Enterprise Linux 5 च्या प्रकाशनात उपलब्ध नाही. Red Hat Enterprise Linux 5 च्या भावी अद्यतनात ही कार्यशीलता जोडली जाईल.

  • kexec आणि kdump दोघेही accraid नियंत्रकास जोडलेल्या डिस्कवर डम्प करण्यास समर्थ नाहीत.

    या समस्येवर उपाय म्हणून, संजाळ डम्पिंगसाठी scp वापरा. विकल्पाने, तुम्ही डिस्कवर निराळ्या नियंत्रकाद्वारेदेखील डम्प करू शकता.

  • tvtime आणि xawtv यांनाbttv कर्नल मॉड्यूलसह वापरणे प्रणाली स्तब्ध होण्यास कारणीभूत ठरते. ही समस्या Red Hat Enterprise Linux 5 च्या येणाऱ्या लघू प्रकाशनात लक्षात घेतली जाईल.

    यावर उपायय म्हणून, mem=3000m पॅरामीटर कर्नल बूट ओळीवर जमा करा.

  • या प्रकाशनाच्या Supplementary CD मध्ये Mozilla प्लगीन्स flash-plugin आणि acroread-plugin यांचा समावेश होतो. हे दोन्ही प्लगीन्स ३२-बिट आहेत, आणि म्हणून ते ६४-बिट Firefox ब्राऊजर सह प्रतिष्ठापित न करण्याची शिफारस करण्यात येते.

  • विभाजित प्रतिष्ठापना माध्यम वापरून पूर्णतः आभासीत अतिथी प्रतिष्ठापित करणे -- विशेषतः, बहू CD-ROMs -- प्रतिष्ठापन CDs मध्ये स्विच करताना अपयशी होऊ शकते. अतिथी OS प्रतिष्ठापन प्रक्रियेदरम्यान, उपयोक्ते प्रतिष्ठापन CDs आरोहित किंवा बाहेर काढण्यापासून उपयोक्त्यास प्रतिबंधित केले जाऊ शकते, ज्यामुळे प्रतिष्ठापन पूर्ण होण्यास बाधा होते.

    यामुळे, शिफारस करण्यात येते की तुम्ही QEMU मॉनिटर कन्सोल वापरून CD-ROM प्रतिमा स्विच कराव्यात अतिथी OS प्रतिष्ठापना प्रक्रियेत. क्रीया खालील प्रमाणे आहे:

    1. अतिथी OS वर आलेखीय VNC कन्सोल उघडा.

    2. CD-ROM यंत्र अतिथी OS मध्ये अनारोहित करा.

    3. Ctrl-Alt-2 दाबून QEMU मॉनिटर कन्सोलवर स्विच करा.

    4. eject hdc आदेश चालवा.

    5. change hdc <path to the CD-ROM in host system> आदेश चालवा.

    6. Ctrl-Alt-1 दाबून परत अतिथी OS कन्सोलवर स्विच करा.

    7. CD-ROM यंत्र अतिथी OS मध्ये आरोहित करा.

    लक्षात घ्या नियमित VNC क्लाएंट वापरताना यजमान X सेवकास काही अडचणी येऊ शकतात Ctrl-Alt-2 आणि Ctrl-Alt-1 आदेश समजण्यामध्ये. यावर उपाय म्हणून virt-manager मध्ये, स्टिकी कळा वापरा. Ctrl तीन वेळा दाबल्याने ते "स्टिकी" बनते पुढील अबदलक दाबेपर्यंत. यामुळे, Ctrl-Alt-1 पाठवण्यासाठी, Ctrl दोनवेळा दाबा Ctrl-Alt-1 दाबण्यापूर्वी.

  • काही मशीनी ज्या NVIDIA आलेखी कार्ड वापरतात त्या भ्रष्ट आलेखी किंवा फॉन्ट दाखवू शकतात आलेखी प्रतिष्ठापक वापरताना किंवा आलेखीय लॉगीनदरम्यान. यावर उपाय म्हणून, आभासी कन्सोलवर स्विच करा आणि परत मूळ X यजमानावर या.

  • Red Hat Enterprise Linux 5 Driver Update Model निर्माण करते बदललेल्या initrd प्रतिमा जेव्हाही kmod संकुल ज्यात बूटपाथ-बदलणाऱ्या ड्राइवरचा समावेश होतो ते प्रतिष्ठापित केले जाते. वेळेमध्ये, बॅकअप initrd प्रतिमांची संख्या /boot विभाजन लवकरच भरू शकतात, विशेषतः जर प्रणालीवर आकारमान्य ड्राइवर अद्यतने झाली.

    यामुळे, हे शिफारसीय आहे की तुम्ही /boot विभाजनावरील मोकळ्या जागेवर लक्ष ठेवावे जर तुम्ही नियमितपणे ड्राइवर अद्यतने करत असाल. तुम्ही /boot विभाजनातील अधिक जागा मोकळी करू शकता जुन्या initrd प्रतिमा काढून टाकून; या फाइली .img0, .img1, .img2, इत्यादींमध्ये संपतात.

  • Red Hat Enterprise Linux आभासीकरण कर्नल ६४GB पेक्षा अधिक स्मृतीसह व्यवस्थित काम करू शकणार नाही. आभासीकरण कर्नल ६४GB पेक्षा अधिक भौतिक स्मृती असलेल्या मशीनवर बूट करण्यासाठी, तुम्हास dom0_mem=4G mem=64G कर्नल आदेश-पंक्तीवर जमा करावे लागू शकते. उदाहरणार्थ:

    शिर्षक Red Hat Enterprise Linux Server (2.6.18-4.el5xen)
            root (hd0,0)
            kernel /xen.gz-2.6.18-4.el5 dom0_mem=4G mem=64G
            module /vmlinuz-2.6.18-4.el5xen ro root=LABEL=/
            module /initrd-2.6.18-4.el5xen.img
    
  • काढण्याजोग्या माध्यमावर ऑटोरन सध्या अकार्यान्वित आहे. Red Hat Enterprise Linux Supplementary CD वरून संकुले प्रतिष्ठापित करण्यासाठी, CD प्रतिष्ठापक स्वहस्ते प्रक्षेपित करा खालील आदेश वापरून:

    system-cdinstall-helper /media/path-to-mounted-drive

  • Red Hat Enterprise Linux 4 पासून Red Hat Enterprise Linux 5 वर सुधारणा करताना, जमावट मार्गदर्शक आपोआप प्रतिष्ठापित होत नाही. तुम्हास pirut वापरावे लागते.

  • autofs त्रुटी बहू-आरोहणे व्यवस्थित चालण्यापासून रोखते.

    समाप्तीच्या वेळी, जर तपासायच्या अखेरच्या बहू-आरोहण घटकास संबंधित आरोहण नसेल इतर घटक व्यस्त असताना, autofs चुकीने बहू-आरोहणास समाप्तीक्षम ठरवते. हे बहू-आरोहणास अंशतः समाप्त होण्यास कारणीभूत होते, परिणामी बहू-आरोहण पुढील आरोहण विनंत्यांसाठी अप्रतिसादी बनते आणि समाप्ती चालू होते.

    ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी, yum update autofs वापरून autofs अद्ययावत करा.

  • प्रणाली kexec/kdump कर्नलमध्ये यशस्वीरित्या रीबूट होणार नाही जर X चालू असेल आणि vesa ऐवजी अन्य ड्राइवर वापरत असेल. ही समस्या फक्त ATI Rage XL आलेखीय चिपसंचासह अस्तित्वात होते.

    जर X ;चालत असेल ATI Rage XL धारी प्रणालीवर, तर खात्री करा की तो vesa ड्राइवर वापरतो यशस्वीरित्या kexec/kdump कर्नलमध्ये रीबूट करण्यासाठी.

  • पूर्णतः आभासीत अतिथी वाचन-लेखन म्हणून आरोहित NFS भागावर boot.iso वापरून निर्माण करणे योग्यरित्या पूर्ण होणार नाही. या समस्येवर उपाय म्हणून, NFS भागास फक्त-वाचन म्हणून आरोहित करा.

    जर तुम्ही NFS भागास फक्त-वाचन म्हणून आरोहित करण्यास असमर्थ असल्यास, boot.iso प्रतिलिपी करा स्थानिक /var/lib/xen/images/ निर्देशिकेत.

सामान्य माहिती

या विभागात सामान्य माहिती आहे जी या दस्तावेजातील कोणत्याही विशिष्ट विभागाशी निगडीत नाही.

Red Hat Enterprise Linux सज्जता मार्गदर्शक

Red Hat Enterprise Linux च्या या प्रकाशनात बऱ्यापैकी परीपूर्ण सज्जता मार्गदर्शक समाविष्ट आहे. ते मिळवण्यासाठी, प्रणाली (वरच्या पॅनेलवर) => दस्तावेजीकरण => Red Hat Enterprise Linux सज्जता मार्गदर्शक वर जा.

Red Hat उद्देश आहे सर्व समर्थीत भाषांमध्ये सज्जता मार्गदर्शकाच्या पूर्णतः स्थानिकीकरण केलेल्या आवृत्ती पुरवणे. जर तुम्ही सज्जता मार्गदर्शकाचे स्थानिकीकरण केलेली आवृत्ती प्रतिष्ठापित केली असेल, तर तुम्हास त्याची नविन आवृत्ती उपलब्ध झाल्यानंतर Red Hat संजाळ द्वारे अद्ययावत करण्याची शिफारस करण्यात येत आहे.

आभासीकरण

Red Hat Enterprise Linux 5 मध्ये i686 आणि x86-64 साठी Xen-आधारित आभासीकरण क्षमता, तसेच आभासित पर्यावरणास व्यवस्थापित करण्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअर इन्फ्रास्ट्रक्चर यांचा समावेश होतो.

आभासीकरणाचे Red Hat Enterprise Linux 5 मधील अवलंबन हाइपरवाइजर वर आधारित आहे, जो अत्यंत कमी खर्चिक आभासीकरण आंशिक आभासीकरणाद्वारे सोयीस्कर करतो. Intel Virtualization Technology किंवा AMD AMD-V सक्षम प्रोसेसरांसह, Red Hat Enterprise Linux 5 मधील आभासीकरणदेखील फेरफार न केलेल्या ऑपरेटींग सिस्टीम्स (कार्यकारी प्रणाल्या) पूर्ण आभासीत रितीमध्ये चालवू शकतो.

Red Hat Enterprise Linux 5 वरील आभासीकरणामध्ये खालील विशेषता देखील आहेत:

  • Libvirt, लायब्ररी जी आभासी मशीन व्यवस्थापित करण्यासाठी सातत्यपूर्ण, पोर्टेबल API पुरवते.

  • Virtual Machine Manager, आभासी मशीनींचे निरीक्षण आणि व्यवस्थापन करण्यासाठी आलेखीय उपयुक्तता.

  • प्रतिष्ठापकामध्ये आभासी मशीन आधार, आभासी मशीनला किकस्टार्ट करण्याच्या क्षमतांसह.

Red Hat संजाळ आभासी मशीनला देखील समर्थन देतो.

या घडीस, आभासीकरण वैशिष्ट्यास खालील मर्यादा आहेत:

  • आभासीकरण जेव्हा कार्यान्वित असेल, RAM चे निलंबन किंवा डिस्कचे निलंबन दोन्ही समर्थित नाहीत, आणि CPU वारंवारता प्रमाणन करता येणार नाही.

  • हार्डवेयर-आभासीत अतिथीस ४GB पेक्षा जास्त आभासी स्मृती असू शकत नाही.

  • पूर्णतः आभासित अतिथी सुरक्षित, पुनःरक्षित किंवा स्थलांतरित करता येत नाहीत.

  • xm create आदेशास आभासी मशीन व्यवस्थापकात आलेखीय समतुल्य नाही.

  • आभासीकरण फक्त ब्रिज्ड संजाळन घटक समर्थित करते. अतिथीद्वारे वापरलेली सर्व संबंधित उपकरणे आपोआप हे मुलभूतरित्या निवडतात.

  • आभासीकरणासाठी मुलभूत Red Hat SELinux धोरण व्यूहरचना फाइली /etc/xen मध्ये लिहीण्यास, लॉग फाइली /var/log/xen/ मध्ये लिहीण्यास, आणि डिस्क फाइली (कोर डम्पसह) /var/lib/xen मध्ये लिहीण्यामात्र संमत करते. ही मुलभूते semanage उपकरण वापरून बदलता येऊ शकतात.

  • आभासीकरणाच्या या प्रकाशनात समाविष्ट हापरवाइजर NUMA-जागृत नाही; ज्यामुळे, NUMA मशीनवरील त्याची कार्यक्षमता कमी परिणामकारक असू शकते. यावर Red Hat Enterprise Linux 5 च्या पुढील अद्यतनामध्ये लक्ष देण्यात येईल.

    यावर उपाय म्हणून, NUMA मशीनच्या BIOS मध्ये memory node interleaving कार्यान्वित करा. हे अधिक सातत्यपूर्ण कामगिरीची खात्री करते.

  • पॅरावर्च्यूलायझ्ड डोमेन सध्या en-US व्यतिरिक्त इतर कीमॅप समर्थित करत नाहीत. यामुळे, इतर कळफलक काही विशिष्ट कीस्ट्रोक्स टाइप करण्यास असमर्थ असू शकतात. यावर Red Hat Enterprise Linux 5 च्या भावी अद्यतनामध्ये लक्ष देण्यात येईल.

  • आभासीत कर्नल kdump फंक्शन वापरू शकत नाही.

  • qcow आणि vmdk प्रतिमा समर्थित नाहीत. अतिथी स्वहस्ते व्यूहरचित करताना, भौतिक किंवा तार्कीक यंत्राद्वारे पाठी राखलेल्या प्रतिमांनी phy: प्रकार वापरावा. फाइलमध्ये पाठी राखलेल्या प्रतिमांसाठी, प्रतिमा प्रकार पॅरावर्च्यूलाइझ्ड अतिथीसाठी tap:aio: वर आणि पूर्ण आभासित अतिथीसाठी file: वर निर्धारित करा.

  • पॅरावर्च्यूलायझ्ड डोमेन्स फक्त संबंधित माउस हलचाल स्वयं-शोधू शकतो, आणि निर्देशक हलचाल बरीच चूकीक्षम आहे. याकडे Red Hat Enterprise Linux 5 च्या भावी आवृत्तीत लक्ष दिले जाईल.

  • पॅरावर्चूअलाइज्ड अतिथीसाठी कार्यरत कन्सोलसाठी, तुम्हास console=xvc0 कर्नल आदेश पंक्तीमध्ये दर्शवावे लागेल.

  • जेव्हा अतिथी कार्यकारी प्रणाल्या स्पार्स फाइली वापरण्यासाठी व्यूहरचित केल्या जातात, dom0 ला डिस्क जागा कमी पडू शकते. अशा घटना अतिथी डिस्कचे लेखन पूर्ण होण्यापासून रोखते, आणि अतिथीमध्ये डेटा नष्ट होण्यास कारणीभूत होऊ शकते. पुढे, स्पार्स फाइली वापरणारे अतिथी सुरक्षितरित्या I/O सिंक्रोनाइझ करत नाहीत.

    यामुळे, हे शिफारसीय आहे की तुम्ही त्याऐवजी गैर-स्पार्स फाइली वापराव्यात. अतिथींना गैर-स्पार्स फाइली वापरण्यासाठी व्यूहरचित करण्यासाठी, virt-install करत असाताना --nonsparse पर्याय वापरा.

वेब सेवक संकुलन बदल

Red Hat Enterprise Linux 5 मध्ये आता Apache HTTP सेवकाच्या आवृत्ती 2.2 चा समावेश होतो. या प्रकाशनात 2.0 मालिकेवरील बऱ्याच सुधारणांचा समावेश होतो, ज्यात आहेत:

  • सुधारित कॅशींग विभाग(मोड्यूल्स) (mod_cache, mod_disk_cache, mod_mem_cache)

  • अधिप्रमाणन आणि अधीकृतता आधारासाठी नविन संरचना, मागील आवृत्त्यांमधील अधिप्रमाणन विभागांस बदली करून

  • प्रॉक्झी भार संतुलनास आधार (mod_proxy_balance)

  • अवाढव्य फाइल(जसे, 2GB पेक्षा मोठ्या) 32-bit प्लॅटफॉर्मवर हाताळण्यासाठी आधार

मुलभूत httpd व्यूहरचनेत खालील बदल केले गेले आहेत:

  • mod_cern_meta आणि mod_asis मोड्यूल्स यापुढे मुलभूतरित्या भारित केले जात नाहीत.

  • mod_ext_filter मोड्यूल आता मुलभूतरित्या भारित केले जाते.

जर Red Hat Enterprise Linux च्या मागील प्रकाशनापासून सुधारणा करत असाल, तर httpd व्यूहरचना httpd2.2 साठी अद्ययावत करावी लागेल. अधिक माहितीसाठी, http:// httpd.apache.org/docs/2.2/upgrading.html चा संदर्भ घ्या.

लक्षात घ्या httpd 2.0 साठी कम्पाइल केलेले कोणतेही तृतीय पक्षीय मोड्यूल्स httpd 2.2 साठी पुनःरचित करावे.

php

PHP ची आवृत्ती 5.1आता Red Hat Enterprise Linux 5 मध्ये समाविष्ट आहे, ज्यात भाषांमधील बऱ्याच बदलांचा कामगिरीतील लक्षणीय सुधारणांसह समावेश होतो. काही स्क्रिप्ट्सना नविन आवृत्त्यांसाठी अनुकूल करावे लागू शकते, कृपया PHP 4.3 मधून PHP 5.1 मध्ये स्थानांतरित होण्याविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकचा संदर्भ घ्या:

http://www.php.net/manual/en/migration5.php

/usr/bin/php हे चालवण्यायोग्य CGI SAPI ऐवजी CLI command-line SAPI वापरून रचली आहे. CGI SAPI साठी /usr/bin/php-cgi वापरा. php-cgi हे एक्झिक्यूटेबलमध्ये सुद्धा FastCGI आधाराचा समावेश होतो.

खालील वाढीव मोड्यूल्स जोडले गेले आहेत:

  • mysqli एक्सटेंशन, विशेषतः MySQL 4.1 साठी रचलेला एक नविन इंटरफेस (php-mysql संकुलात समाविष्ट )

  • दिनांक, हॅश, परावर्तन, SPL आणि SimpleXML (php संकुलासह बांधलेले)

  • pdo आणि pdo_psqlite (php-pdo संकुलामध्ये)

  • pdo_mysql (php-mysql संकुलामध्ये)

  • pdo_pgsql (php-pgsql संकुलामध्ये)

  • pdo_odbc (php-odbc संकुलामध्ये)

  • soap (php-soap संकुलामध्ये)

  • xmlreader आणि xmlwriter (php-xml संकुलामध्ये)

  • dom(domxml एक्सटेंशनला बदलून; php-xml संकुलामध्ये)

खालील एक्सटेंशन मोड्यूल्स यापुढे समाविष्ट केलेले जाणार नाहीत:

  • dbx

  • dio

  • yp

  • ओझे

  • domxml

PEAR फ्रेमवर्क

PEAR फ्रेमवर्क आता php-pear संकुलात संकुलीत केले आहे. फक्त खालील PEAR घटक Red Hat Enterprise Linux 5 मध्ये समाविष्ट केले आहेत:

  • Archive_Tar

  • Console_Getopt

  • XML_RPC

एनक्रिप्टेड स्वॅप विभाजने आणि गैर-रूट फाइल प्रणाल्या

Red Hat Enterprise Linux 5 आता एनक्रिप्टेड स्वॅप विभाजने आणि गैर-रूट फाइल प्रणाल्या यांस मुलभूत आधार पुरवतो. ही वैशिष्ट्ये वापरण्यासाठी, /etc/crypttab मध्ये योग्य नोंदी जमा करा आणि /etc/fstab मध्ये निर्माण केलेल्या यंत्रांचा संदर्भ द्या.

खाली साधी /etc/crypttab नोंद आहे:

my_swap /dev/hdb1 /dev/urandom swap,cipher=aes-cbc-essiv:sha256

हे एनक्रिप्टेड ब्लॉक यंत्र /dev/mapper/my_swap बनवते, जे /etc/fstab मध्ये संदर्भले जाऊ शकते.

खाली /etc/crypttab मध्ये फाइल प्रणाली खंडाच्या नोंदीचा नमुना आहे:

my_volume /dev/hda5 /etc/volume_key cipher=aes-cbc-essiv:sha256

/etc/volume_key मध्ये पाठ स्वरूपात एनक्रिप्शन कळ आहे. तुम्ही none अशी कळ फाइलदेखील दर्शवू शकता; ज्यामुळे प्रणाली तुम्हास बूट होताना एनक्रिप्शन कळ विचारण्यास व्यूहरचित होते.

फाइल प्रणाली खंड रचण्यासाठी LUKS(Linux Unified Key Setup) वापरणे शिफारसित आहे. हे करण्यासाठी खालील टप्पे पार करा:

  1. cryptsetup luksFormat वापरून एनक्रप्टेड खंड बनवा.

  2. /etc/crypttab फाइलमध्ये आवश्यक नोंद जोडा.

  3. cryptsetup luksOpen (किंवा रीबूट) वापरून खंड स्वहस्ते रचता येतो.

  4. एनक्रिप्टेड खंडावर फाइल प्रणाली बनवा.

  5. /etc/fstab मध्ये आवश्यक नोंद जोडा.

आरोहण आणि अनारोहण

mount आणि umount यापुढे NFS थेट आधार देणार नाहीत; बिल्ट-इन NFS क्लाएंट यापुढे अस्तित्वात नसेल. एक वेगळे संकुल nfs-utils, जे /sbin/mount.nfs आणि /sbin/umount.nfs सहाय्यक पुरवते, यासाठी प्रतिष्ठापित असावे.

CUPS मुद्रक ब्राउसिंग

स्थानिक सबनेटवर CUPS मुद्रक ब्राउसिंग व्यूहरचना system-config-printer हे आलेखीय उपकरण वापरू शकता. हे CUPS च्या वेब इंटरफेसवर, http://localhost:631/ येथे देखील तपासू शकता.

सबनेट्समध्ये ब्राउसिंग करत असलेल्या मुद्रकांसाठी दिग्दर्शित ब्रॉडकास्ट वापरण्यासाठी, क्लाएंटवर /etc/cups/cupsd.conf उघडा आणि BrowseAllow @LOCAL ला BrowseAllow ALL ने बदला.

ATI आणि R500 आधार

R500 चिपसेटवर आधारित ATI आलेखन कार्ड फक्त vesa ड्राइवरसाठी समर्थित आहे, आणि बाह्य मॉनिटर्स, LCD प्रदर्शक, किंवा संवेगीत 3D आधार Red Hat Enterprise Linux 5 द्वारे समर्थित नाहीत.

up2date आणि yum

up2date नापसंत केले गेले आहे yum (Yellowdog Updater Modified) च्या आवडीसाठी. यामुळे, तुम्हास सल्ला देण्यात येतो की तुमची प्रणाली वापरत असलेली एखादी up2date-आधारित स्क्रीप्ट त्या अनुषंगाने पुन्हा तपासून दुरूस्त कराव्यात. yum विषयी अधिक माहितीसाठी, त्याच्या man पानाचा man yum आदेशाद्वारे संदर्भ घ्या; तुम्ही प्रतिष्ठापित दस्तावेजांचा /usr/share/doc/yum-<version> आणि /usr/share/doc/yum-metadata-parser-<version> या निर्देशिकांत देखील संदर्भ घेऊ शकता (<version> ला yum आणि yum-metadata-parser च्या संबंधित प्रतिष्ठापित आवृत्तीने बदला).

OpenLDAP सेवक आणि Red Hat निर्देशिका सेवक

Red Hat निर्देशिका सेवक हा LDAP-आधारित सेवक आहे जो व्यावसायीक आणि संजाळ डेटा OS-स्वतंत्र, संजाळ-आधारित रजिस्ट्रीवर केंद्रीत करतो. तो OpenLDAP सेवक घटकांस पर्याय बनण्याच्या तयारित आहे, जो Red Hat Enterprise Linux 5 नंतर नापसंत केला जाईल. Red Hat निर्देशिका सेवकाविषयी अधिक माहितीसाठी , http://www.redhat.com/software/rha/directory/ चा संदर्भ घ्या.

i810 ड्राइवर आणि i830 आधार

i810 ड्राइवर आधार सर्व Intel आलेखन चिपसेटमध्ये, i810 ते i965 पर्यंत एकीकृत केले आहेत. तरीही, i830 (आणि नविन) चिपसेटसाठी आधार मर्यादित आहे; i810 ड्राइवर फक्त विडिओ BIOS मध्ये नमुद रीतीच निर्धारित करू शकतो. जर तुमच्या मशीनमध्ये i830 किंवा नविन चिपसेट प्रतिष्ठापित असेल, तर कोणत्या रीती उपलब्ध आहेत हे ठरवण्यासाठी खालील आदेश चालवा:

grep Mode: /var/log/Xorg.0.log

तारांकित रीती (*) निवडीसाठी उपलब्ध आहेत.

बऱ्याच लॅपटॉपचे विडिओ BIOSes स्थानिक पॅनेल आकाराशी जुळणारी रीत समर्थित करत नाहीत. त्यामुळे निवडलेली रीत ताणलेली, विरूपित, किंवा काळ्या सीमांसह दिसू शकते. अशा वेळी, जर तुमची निवडलेली रीत व्यवस्थित दिसत नसल्यास, स्थानिक पॅनेल आकार योग्यरित्या काम करण्यासाठी तुम्हास तुमच्या हार्डवेयर विक्रेत्याकडून BIOS च्या अद्यतनाची गरज पडेल.

स्मार्ट कार्ड लॉगीन

Red Hat Enterprise Linux 5 मध्ये स्मार्ट कार्ड साठी समर्थन समाविष्ट आहे, जे तुमच्या कळ जोडी आणि संबंधित सार्वजनिक कळ प्रमाणपत्रासाठी सुरक्षित संग्रह पुरवते. या कळा PIN द्वारे सुरक्षित केल्या जातात ज्या तुम्हास स्मार्ट कार्डवर कळ किंवा प्रमापत्राची गरज असल्यास दाखल करावी लागते.

स्मार्ट कार्डना Red Hat Enterprise Linux 5 पर्यावरणात सज्ज केल्याने तुम्हास Kerberos आणि S/MIME सारख्या वैशिष्ट्यांचा फायदा अधिप्रमाणनसंबंधी सुरक्षा वाढवण्यास संमत करते. Red Hat Enterprise Linux 5 खालील समर्थन करते:

  • Axalto Cyberflex 32K e-Gate

  • DoD CAC कार्डस्

स्मार्ट कार्ड अधिप्रमाणन व्यवस्थित करण्यासाठी, तुमचे संजाळ Red Hat निर्देशिका सेवक आणि Red Hat प्रमाणपत्र प्रणालीसह सज्ज असावी लागेल. स्मार्ट कार्ड विषयी अधिक माहितीसाठी, Red Hat Enterprise Linux सज्जता मार्गदर्शकातील Single Sign-On पाठाचा संदर्भ घ्या.

Intel PRO/Wireless 3945ABG संजाळ जोडणी आधार

Red Hat Enterprise Linux 5 च्या प्रकाशनात ipw3945 (Intel PRO/Wireless 3945ABG संजाळ जोडणी) अडाप्टरचा समावेश होतो. Red Hat Enterprise Linux 5 पुरवणी डिस्कमध्ये ड्राइवर, नियमक डीमन आणि या अडाप्टरला आधार देण्यासाठी फर्मवेयर यांचा समावेश आहे.

ipw3945 बिनतारी अडाप्टरसाठी समर्थन कार्यान्वित करण्यासाठी, Red Hat Enterprise Linux 5 पुरवणी डिस्क "3945" समावेषित फाइलनामांसह संकुलांचा शोध घ्या आणि त्यांस प्रतिष्ठापित करा.

rawio

rawio हा नापसंत केलेला इंटरफेस आहे; तरीही, Red Hat Enterprise Linux 5 मध्ये अजुनही त्यासाठी समर्थन समाविष्ट आहे. जर तुमच्याकडे अनुप्रयोग आहे जो यंत्र प्रवेश rawio वापरून करतो, तर हे अत्यंत शिफारसीय आहे की तुम्ही तुमचा अनुप्रयोग ब्लॉक यंत्रांस O_DIRECT ध्वजासह उघडण्यासाठी बदलावे. rawio इंटरफेस Red Hat Enterprise Linux 5 च्या आयुष्यभर शिल्लक राहील, पण तो भविष्यात काढला जाणारा उमेदवार आहे.

सध्या, फाइलप्रणालीवर AIO (Asynchronous I/O) फक्त O_DIRECT किंवा बिन-बफरच्या रीतीमध्ये समर्थित आहे. पुढे, लक्षात घ्या की असिंक्रोनस पोल इंटरफेस यापुढे उपस्थित नाही, आणि पाइपांवरील AIO यापुढे समर्थित नाही.

ctmpc

ctmpc हा नापसंत केलेला ड्राइवर आहे; तरीही, तो Red Hat Enterprise Linux 5 च्या आयुष्यभर समाविष्ट राहील. पण लक्षात घ्या तो भविष्यातील प्रकाशनांमधून काढला जाणारा उमेदवार आहे.

धोरण विभाग आणि semanage आधार

Red Hat Enterprise Linux 5 आता धोरण मॉड्यूल्स आणि semanage यांना समर्थन देते. धोरण मॉड्यूल धोरण ऐच्छिके आणि तृतीय-पक्षीय धोरणांची निर्मिती आणि वितरण semodule आणि checkmodule उपरकरणे वापरून सोपे करते.

semanage उपकरण हे एक धोरण व्यवस्थापन उपकरण आहे जे SELinux व्यूहरचनेत फेरफार करते. हे तुम्हास फाइल संदर्भ, संजाळ घटक लेबलिंग, आणि Linux-to-SELinux उपयोक्ता मॅपिंग व्यूहरचित करण्यास संमत करते.

raw यंत्र मॅपिंग

raw यंत्रे इंटरफेस Red Hat Enterprise Linux 5 मध्ये नापसंत केला आहे; raw यंत्र मॅपिंग आता udev नियमांमार्फत व्यूहरचित होते.

raw यंत्र मॅपिंग व्यूहरचित करण्यासाठी, सुयोग्य नोंदी /etc/udev/rules.d/60-raw.rules मध्ये खालील स्वरूपात टाका:

  • यंत्र नावांसाठी:

    ACTION=="add", KERNEL="<device name>", RUN+="raw /dev/raw/rawX %N"
    
  • मुख्य / लघू क्रमांकांसाठी:

    ACTION=="add", ENV{MAJOR}="A", ENV{MINOR}="B", RUN+="raw /dev/raw/rawX %M %m"
    

<device name> तुम्हास बाइंड करावयाच्या यंत्राच्या नावाने बदला (उदाहरणार्थ, /dev/sda1). "A" आणि "B" तुम्ही बाइंड करणे गरजेचे असलेल्या यंत्राचे मुख्य / लघु क्रमांक आहेत, आणि X हा raw यंत्र क्रमांक आहे जो तुम्हास प्रणालीने वापरावा असे वाटते.

तुमच्याकडे मोठी, पूर्व-अस्तित्वात असलेली /etc/sysconfig/rawdevices फाइल असेल्यास, तिला खालील स्क्रीप्टने रूपांतरीत करा:

#!/bin/sh

grep -v "^ *#" /etc/sysconfig/rawdevices | grep -v "^$" | while read dev major minor ; do
        if [ -z "$minor" ]; then
                echo "ACTION==\"add\", KERNEL==\"${major##/dev/}\", RUN+=\"/usr/bin/raw $dev %N\""
        else
                echo "ACTION==\"add\", ENV{MAJOR}==\"$major\", ENV{MINOR}==\"$minor\", RUN+=\"/usr/bin/raw $dev %M %m\""
        fi
done
QLogic आधार

Red Hat Enterprise Linux 5 समर्थन करतो QLogic या iSCSI HBA (Host Bus Adapters) कुटूंबाचे. या घडीला, या बोर्डांस फक्त iSCSI इंटरफेस समर्थित आहेत (qla4xxx ड्राइवर वापरून).

या व्यतिरिक्त, Red Hat या बोर्डांस सध्या Ethernet NIC म्हणून समर्थन करत नाही, कारण यासाठी qla3xxx ड्राइवरची गरज आहे. हा मुद्दा Red Hat Enterprise Linux 5 च्या आगामी लघु प्रकाशनांत लक्षात घेतला जाईल.

IBM System z सुचना संच

IBM System z सुचना संचाचा ३१-बिट अनुप्रयोगांसाठी सर्वाधिक वापर करून घेण्यासाठी, हे शिफारसीय आहे कि तुम्ही gcc पर्याय -march=z900 वापरावे. ६४-बिट अनुप्रयोगांसाठी, gcc मुलभूतरित्या IBM System z सुचना संचाचा वापर करून घेईल.

Linux साठी iSeries प्रवेश

Linux साठी iSeries ODBC Driver ड्राइवर Linux साठी iSeries Access द्वारे बदली केला आहे, जो खालील लिंकवरून डाउनलोड केला जाऊ शकतो:

http://www.ibm.com/eserver/iseries/access/linux/

Linux साठी iSeries Access Linux-आधारित प्रवेश iSeries सेवकांवर पुरवतो, आणि तुम्हास संमत करतो:

  • iSeries साठी DB2 UDB (Universal Database) प्रवेश ODBC ड्राइवर वापरून

  • Linux क्लाएंटपासून iSeries सेवकावर 5250 सत्र प्रस्थापित करणे

  • EDRS (Extended Dynamic Remote SQL) ड्राइवरमार्फत DB2 UDB प्रवेश

  • ३२-बिट (i386 आणि PowerPC) आणि ६४-बिट (x86-64 आणि PowerPC) प्लॅटफॉर्मला आधार

IBM Power4 iSeries

Red Hat Enterprise Linux यापुढे IBM Power4 iSeries ला आधार देत नाही.

ड्राइवर अद्ययावत कार्यक्रम

या विभागात Red Hat Enterprise Linux 5 ड्राइवर अद्यतन कार्यक्रमाच्या अवलंबनाविषयी माहिती समाविष्ट आहे.

कर्नल मॉड्यूल संकुले

Red Hat Enterprise Linux 5 वर, अद्ययावत कर्नल संकुले जी चालू कर्नल ABI आवृत्तीवर अवलंबून आहेत आणि विशिष्ट कर्नल प्रकाशन क्रमांकावर नाही त्यांची बांधणी करणे शक्य आहे. यामुळे एकट्या प्रकाशनाऐवजी विविध Red Hat Enterprise Linux 5 कर्नलांसाठी कर्नल विभाग बांधणे सुलभ होते. प्रकल्पाच्या संकेतस्थळावर http://www.kerneldrivers.org/ संकुलन प्रक्रियेविषयी अधिक माहिती उदाहरणांसह उपलब्ध आहे.

लक्षात घ्या खालील मुद्दे ओळखले गेले आहेत:

  • kmod संकुले म्हणून वितरित Bootpath ड्राइवर अधिकृतरित्या समर्थित नाहीत.

  • अस्तित्वात असलेले गिरवणारे इन-कर्नल ड्राइवर सध्या समर्थित नाहीत.

मुद्दे Red Hat Enterprise Linux 5 च्या भावी अद्यतनांमध्ये लक्षात घेतले जातील.

कर्नल मॉड्यूल लोडींग

Red Hat Enterprise Linux 5 मध्ये मॉड्यूल लोडींग वर्तन Red Hat Enterprise Linux च्या मागील प्रकाशनापासून बदलले आहे. Red Hat Enterprise Linux 5 कर्नल संकुलात पाठवलेले मॉड्यूल्स स्वाक्षरित आहेत, Red Hat Enterprise Linux 4 मध्ये असल्याप्रमाणे. Red Hat Enterprise Linux 5 कर्नल्सवर, तरीही, एका स्वाक्षरित मॉड्यूलला अन्य कर्नल बांधणीवरून भारित करणे यापुढे शक्य नाही.

याचा अर्थ प्रारंभिक Red Hat Enterprise Linux 5 वितरणासह पाठवलेले मॉड्यूल्स भावी अद्ययावत कर्नलमध्ये भारित केले जाऊ शकत नाहीत. हे उपयोक्त्यांस प्रणालीवर असमर्थित मॉड्यूल्स भारित करण्यापासून थोपवते. Red Hat फक्त स्वाक्षरित आणि वितरणात समाविष्ट मॉड्यूल्स समर्थित करतो.

तुम्हास जुने मॉड्यूल जमा करायचे असल्यास, तुम्ही स्वाक्षरीविना त्याच्या पुनर्बांधणीचा प्रयत्न करू शकता. विकल्पाने, तुम्ही खालील आदेश वापरून बायनरी फाइलमधून स्वाक्षरी काढून टाकू शकता:

objcopy -R .module_sig <module name>-mod.ko <module name>-nosig.ko

अस्वाक्षरित मॉड्यूल्स लोड करण्यापूर्वी पदस्थ Red Hat वैश्विक आधार प्रतिनिधीशी सल्लामसलत करण्याचे तुम्हास शिफारसीय आहे.

आंतरराष्ट्रीयकरण

या विभागात Red Hat Enterprise Linux 5 च्या अंतर्गत असलेल्या भाषा आधारा विषयी माहिती समाविष्ट आहे.

आदान पद्धती

SCIM (Smart Common Input Method) ने या प्रकाशनात IIIMF ची जागा आशियायी आणि इतर भाषांसाठी आदान पद्धती म्हणून घेतली आहे. SCIM साठी मुलभूत GTK आदान पद्धती scim-bridge द्वारे पुरवली जाते; Qt मध्ये ती scim-qtimm द्वारे पुरवली जाते.

खाली विविध भाषांसाठी मुलभूत ट्रिगर हॉटकीझ आहेत:

  • सर्व भाषा: Ctrl-Space

  • जपानी: Zenkaku-Hankaku किंवा Alt-`

  • कोरिअन: Shift-Space

जर SCIM प्रतिष्ठापित असेल, तर ते सर्व उपयोक्त्यांसाठी मुलभूतरित्या चालते.

SCIM अभियंत्र संकुले प्रतिष्ठापित किंवा काढून टाकल्यानंतर, बदल SCIM भाषा मेनूमध्ये दिसण्यासाठी नविन डेस्कटॉप सत्र सुरू करणे शिफारसीत आहे.

भाषा प्रतिष्ठापन

आशियायी भाषांसाठी अतिरिक्त भाषा आधार कार्यान्वित करण्यासाठी, तुम्हास आवश्यक भाषा आधार संकुले प्रतिष्ठापित करण्याची गरज आहे. खाली या भाषांची आणि त्यांचे संबंधित भाषा आधार संकुले प्रतिष्ठापित करण्यासाठी चालवायच्या (रूट म्हणून) आदेशांची यादी आहे:

  • आसामी — yum install fonts-bengali m17n-db-assamese scim-m17n

  • बंगाली — yum install fonts-bengali m17n-db-bengali scim-m17n

  • चिनी — yum install fonts-chinese scim-chewing scim-pinyin scim-tables-chinese

  • गुजराती — yum install fonts-gujarati m17n-db-gujarati scim-m17n

  • हिन्दी — yum install fonts-hindi m17n-db-hindi scim-m17n

  • जपानी — yum install fonts-japanese scim-anthy

  • कन्नड — yum install fonts-kannada m17n-db-kannada scim-m17n

  • कोरियन — yum install fonts-korean scim-hangul

  • मलयालम — yum install fonts-malayalam m17n-db-malayalam scim-m17n

  • मराठी — yum install fonts-hindi m17n-db-marathi scim-m17n

  • ओरिया — yum install fonts-oriya m17n-db-oriya scim-m17n

  • पंजाबी — yum install fonts-punjabi m17n-db-punjabi scim-m17n

  • सिंहली — yum install fonts-sinhala m17n-db-sinhala scim-m17n

  • तमिल — yum install fonts-tamil m17n-db-tamil scim-m17n

  • तेलुगु — yum install fonts-telugu m17n-db-telugu scim-m17n

हे देखील शिफारसीय आहे की तुम्ही scim-bridge-gtk आणि scim-qtimm अतिरिक्त भाषा आधार कार्यान्वित करण्यावेळी प्रतिष्ठापित करावे. scim-bridge-gtk संकुल libstdc++ च्या जुन्या आवृत्त्यांशी लिंक असलेल्या तृतीय-पक्षीय अनुप्रयोगांशी बायनरी शक्य संघर्ष रोखते.

नोंद करा अतिरिक्त भाषा पॅक यासाठीदेखील उपलब्ध आहेत OpenOffice (openoffice.org-langpack-<language code>_<locale>) आणि KDE (kde-i18n-<language>). ही संकुलादेखील yum द्वारे प्रतिष्ठापित करता येतात.

im-निवडक

im-chooser नावाचे नविन उपयोक्ता व्यूहरचना उपकरण जोडण्यात आले आहे, जे तुम्हास तुमच्या डेस्कटॉपवरील आदान पद्धती सहज कार्यान्वित किंवा अकार्यान्वित करण्याची सोय देते. म्हणून जर तुमच्या डेस्कटॉपवर SCIM प्रतिष्ठापित असेल, पण तुम्ही तो तुमच्या डेस्कटॉपवर चालवू इच्छित नाही, तुम्ही त्यास im-chooser वापरून अकार्यान्वित करू शकता.

xinputrc

X सुरू होताना, xinput.sh आता ~/.xinput.d/ किंवा /etc/xinit/xinput.d/ मध्ये व्यूहरचना फाइली शोधण्याऐवजी ~/.xinputrc किंवा /etc/X11/xinit/xinputrc यांना स्त्रोत करते.

Firefox मध्ये Pango आधार

Red Hat Enterprise Linux 5 मधील Firefox रचला आहे Pango सह, जो काही लिप्यांसाठी चांगला आधार पुरवतो, जसे भारतीय तसेच काही CJK लिप्या.

Pango चा वापर अकार्यान्वित करण्यासाठी, तुमच्या पर्यावरणात MOZ_DISABLE_PANGO=1 हे Firefox प्रक्षेपित करण्यापुर्वी निर्धारित करा.

फॉन्ट्स

आता ज्या फॉन्टचा बोल्ड आकार उपलब्ध नसेल त्यासाठी सिंथेटिक एम्बोल्डनिंगला आधार उपलब्ध आहे.

चिनीसाठी नविन फॉन्ट्स जमा केले आहेत: AR PL ShanHeiSun Uni (uming.ttf) आणि AR PL ZenKai Uni (ukai.ttf). मुलभूत फॉन्ट आहे AR PL ShanHeiSun Uni, ज्यात एम्बेडेड बिटमॅप्सचा समावेश होतो. जर तुम्ही बाह्यरेखा आकार पसंत करत असाल, तर तुम्ही तुमच्या ~/.font.conf फाइलमध्ये खालील विभाग जोडा:

<fontconfig>
 <match target="font">
   <test name="family" compare="eq">
     <string>AR PL ShanHeiSun Uni</string>
   </test>
   <edit name="embeddedbitmap" mode="assign">
     <bool>false</bool>
   </edit>
 </match>
</fontconfig>                                
                        
gtk2 IM उपमेनु

Gtk2 संदर्भ मेनू IM उपमेनू यापुढे मुलभूतरित्या दिसणार नाही. तुम्ही त्यास आदेश पंक्तीवर खालील आदेश देऊन कार्यान्वित करू शकता:

gconftool-2 --type bool --set '/desktop/gnome/interface/show_input_method_menu' true

CJK वर पाठ प्रतिष्ठापनासाठी आधार

CJK (चीनी, जपानी आणि केरिअन) रेंडरींग आधार ऍनाकोंडा पाठ प्रतिष्ठापनातून काढून टाकला आहे. पाठ प्रतिष्ठापन पद्धती भविष्याच्या दृष्टीने नापसंत केली जात आहे कारण, GUI प्रतिष्ठापन, VNC आणि किकस्टार्ट या पद्धती पसंत केल्या जातात.

gtk+ नापसंती

खालील संकुले Red Hat Enterprise Linux मध्ये नापसंत आणि काढून टाकण्याच्या मार्गावर आहेत:

  • gtk+

  • gdk-pixbuf

  • glib

ही संकुले gtk2 स्टॅकच्या आवडीसाठी नापसंत केली आहेत, जो आंतरराष्ट्रीयकरण आणि फॉन्ट हाताळणीच्या दृष्टीने अधिक चांगली कार्यशीलता पुरवतो.

कन्सोलवर CJK आदान

जर तुम्हास कन्सोलवर चिनी, जपानी, किंवा कोरिअन पाठ दर्शवायचे असल्यास, तुम्हास फ्रेमबफर व्यवस्थित करावा लागेल; नंतर, bogl-bterm, प्रतिष्ठापित करा आणि bterm फ्रेमबफरवर चालवा.

कर्नल टिपा

या विभागात 2.6.9(ज्यावर Red Hat Enterprise Linux 4 आधारित आहे) आणि 2.6.18(जो Red Hat Enterprise Linux 5 वारस(inherit) घेईल) मधील फरक १२ जुलै, २००६ नुसार नमुद केले आहेत. अतिरिक्त वैशिष्ट्ये जी सध्या अपस्ट्रीम काम करताहेत(उदा. आभासीकरण) ती 2.6.18 किंवा 2.6.19 मध्ये दृष्टीस येतील ती येथे अधोरेखीत केलेली नाहीत. दुसऱ्या शब्दांत, ही यादी फक्त अपस्ट्रीम Linus वृक्षात आधीच काय समाविष्ट केले आहे हेच दाखवते, प्रगतीशील कार्य नव्हे. परिणामतः, ही यादी अंतिम नाही, किंवा नविन Red Hat Enterprise Linux 5 च्या वैशिष्ट्यांची पूर्ण यादी नाही, तरीही ती काय अपेक्षित केले जाऊ शकते याची चांगली कल्पना देते. हेही लक्षात घ्या कि हा विभाग अपस्ट्रीममधील फक्त महत्वाचे बदल निवडतो, आणि तो पूर्ण विस्ताराने नाही. यात अनेक खालच्या स्तरावरील हार्डवेअर आधारातील सुधारणा आणि यंत्र ड्राइवर माहितीचा उल्लेख नाही.

विस्तारित-तपशिलाच्या पुढील स्तराच्या दृश्यासाठी खाली चांगला स्त्रोत दिला आहे:

http://kernelnewbies.org/LinuxChanges

कामगिरी / स्केलेबिलिटी
  • Big Kernel Lock पूर्वनिश्चयन (2.6.10)

  • Voluntary preemption patches (2.6.13) (Red Hat Enterprise Linux 4 मधील उपसंच)

  • futexes साठी हलका उपयोक्तास्थळ प्रायोरिटी इनहेरिटन्स (PI), वास्तव-कालीक अनुप्रयोगांसाठी (2.6.18) उपयोगी

  • नविन 'mutex' locking primitive (2.6.16)

  • उच्च रिझोल्यूशन टाइमर्स (2.6.16)

    • kernel/timer.c मध्ये अंमलीत कमी-रिझॉल्यूशन कालबाद API शी विरोधाभासी, hrtimers प्रणालीच्या व्यूहरचना आणि क्षमतेवर अवलंबून चांगला रिझॉल्यूशन आणि अचुकता पुरवतो. हे टाइमर सध्या itimers, POSIX टाइमर, nanosleep आणि precise in-kernel टाइमिंगसाठी वापरले जातात.

  • विभागीय, तत्काळ परिवर्तनीय IO नियोजक (2.6.10)

    • फक्त Red Hat Enterprise Linux 4 या बूट पर्यायाद्वारे हे बदलानुकारी होते (तेही प्रति-रांगेऐवजी प्रणाली व्यापी).

  • 4-स्तर पेज टेबलमध्ये रुपांतरण (2.6.11)

    • x86-64 ला 512G पासून 128TB स्मृतीपर्यंत वाढवण्यास अनुमती देतो

  • नविन पाईप अवलंबन(2.6.11)

    • पाइप बँडविड्थमध्ये ३०-९० % कामगिरी सुधारणा

    • वतृळीय बफर लेखकांस अडवण्याऐवजी अधिक बफरींग पुरवतो

  • "Big Kernel Semaphore": Big Kernel Lock ला semaphore मध्ये बदलतो

    • लेटन्सी(उशीर) दीर्घ ताळा काळ तोडून आणि स्वेच्छा व्यत्यय जमा करून कमी करते

  • X86 "SMP पर्याय"

    • उपलब्ध प्लॅटफॉर्मनुसार कर्नल प्रतिमा रनटाइममध्ये अनुकूल करते

    • संदर्भ: http://lwn.net/Articles/164121/

  • libhugetlbfs

    • अनुप्रयोगांस Linux मध्ये अवाढव्य पृष्ठ आधार स्त्रोत कोडमध्ये बदल न करता वापरण्यास संमत करते

  • kernel-headers संकुल

    • glibc-kernheaders संकुलास बदली करते

    • 2.6.18 कर्नलच्या headers_install या नव्या वैशिष्ट्यासह अधिक अनुकूलता पुरवते

    • लक्षवेधी कर्नल शिर्षक-संबंधी बदल:

      • <linux/compiler.h> शिर्षक फाइल काढून टाकली, कारण ती यापुढे निरूपयोगी होती

      • _syscallX() मॅक्रो काढून टाकला; उपयोक्ता-क्षेत्राने याऐवजी C लायब्ररीमधून syscall() वापरावी

      • <asm/atomic.h> आणि <asm/bitops.h> या शिर्षक फाइल काढून टाकल्या; C कंपायलर उपयोक्ता-क्षेत्र कार्यक्रमांसाठी अधिक अनुकूल स्वतःची आण्विक फंक्शन्स पुरवतो

      • #ifdef __KERNEL__ द्वारे पूर्वी संरक्षित केलेला मजकूर आता unifdef उपकरणाद्वारे पूर्णपणे काढून टाकला आहे; जे भाग उपयोक्ता-क्षेत्रास दृश्य नसावेत ते व्याख्यीत पाहण्यासाठी __KERNEL__ ला व्याख्यीत करून

      • PAGE_SIZE मॅक्रो काही आर्किटेक्चर्समधून पेज आकारांच्या बदलांमुळे काढून टाकण्यात आला, उपयोक्ता-क्षेत्राने sysconf(_SC_PAGE_SIZE) किंवा getpagesize() वापरावे

    • उपयोक्ता-क्षेत्रासाठी अधिक अनुकूलतेसाठी, विविध शिर्षक फाइल आणि शिर्षक गाभे काढून टाकले

सर्वसामान्य वैशिष्ट्यांची मिळवण

  • kexec आणि kdump (2.6.13)

    • diskdump आणि netdump आता kexec आणि kdump यांद्वारे बदली केले आहेत, जे वेगवान बूट-अप आणि विश्वसनीय कर्नल vmcores चिकित्सा खात्रीदायी करेल. अधिक माहीती आणि व्यूहरचना सुचनांसाठी, कृपया /usr/share/doc/kexec-tools-<version>/kexec-kdump-howto.txt चा संदर्भ घ्या (<version> ला kexec-tools संकुलाच्या प्रतिष्ठापित संबंधित आवृत्तीने बदला).

    • लक्षात घ्या या घडीस, आभासित कर्नल्स kdump फंक्शन वापरू शकत नाहीत.

  • inotify (2.6.13)

    • यासाठी उपयोक्ता इंटरफेस खालील syscalls द्वारे आहे: sys_inotify_init, sys_inotify_add_watch, आणि sys_inotify_rm_watch.

  • कार्यपद्धती घटनात्मक संपर्कारक (2.6.15)

    • fork, exec, id बदल, बाहेर पडणे या सर्व प्रक्रियांच्या घटना उपयोक्त-क्षेत्रास वर्तवतो.

    • ज्या अनुप्रयोगांस या घटना उपयुक्त ठरू शकतात त्यात समावेश होतो अकाउंटींग/ ऑडिटींग (उदाहरणार्थ, ELSA), प्रणाली क्रिया मॉनिटरिंग (उदाहरणार्थ, top), सुरक्षा, आणि संसाधन व्यवस्थापन (उदाहरणार्थ, CKRM). Semantics प्रति-उपयोक्ता-नामक्षेत्र, "निर्देशिकांप्रमाणे फाइली" आणि आवृत्त्यांसह फाइल प्रणाल्या यांसारख्या वैशिष्ट्यांसाठी मुख्य भाग पुरवतात.

  • सामान्य RTC (RealTime घड्याळ) उपप्रणाली (2.6.17)

  • स्पालाईस (2.6.17)

    • नविन IO पद्धती जी अनुप्रयोगांदरम्यान डेटा परिवहन करताना डेटा प्रतिलिपी करणे टाळते

    • संदर्भ: http://lwn.net/Articles/178199/

फाइल प्रणाली / LVM

  • EXT3

    • ext3 मधील मोठ्या inode च्या भागात विस्तृत लक्षणांस आधार: जागा वाचवतो आणि काही बाबतींत कामगिरी सुधारतो (2.6.11)

  • यंत्र मॅपर बहुपथ आधार

  • NFSv3 आणि NFSv4 साठी ACL आधार(2.6.13)

  • NFS: तारेवरून मोठे वाचन आणि लेखन करण्यास आधार (2.6.16)

    • Linux NFS क्लाएंट आता 1MB पर्यंत परिवहनास आधार देतो.

  • VFS बदल

    • "वाटलेला उपवृक्ष" पॅचेस एकत्रित केले आहेत. (2.6.15)

    • संदर्भ: http://lwn.net/Articles/159077/

  • मोठी CIFS पाने (2.6.15)

    • विविध कार्यशीलता सुधारणा तसेच केबेरॉस आणि CIFS ACL यांना आधार देतो

  • autofs4: उपयोक्ताक्षेत्र autofs ला थेट आरोहण आधार देण्यासाठी अद्ययावत (2.6.18)

  • cachefs कोर सक्रीयक (2.6.18)

सुरक्षा

  • SELinux मध्ये बहुस्तरीय सुरक्षा अवलंबन (2.6.12)

  • ऑडिट उपप्रणाली

    • प्रक्रिया-संदर्भीत गाळणीस आधार (2.6.17)

    • अधिक गाळणी नियम तुलनाकार (2.6.17)

  • TCP/UDP getpeercon: सॉकेटच्या दूसऱ्या बाजूच्या प्रक्रीयेचा संपूर्ण सुरक्षा संदर्भ IPSec सुरक्षा संस्था वापरून मिळवण्यासाठी कार्यान्वित सुरक्षा-जागृत अनुप्रयोग . जर फक्त MLS-स्तर माहिती हवी असेल किंवा प्राचिन unix प्रणालीशी आंतरक्रीयाक्षमता हवी असल्यास, IPSec च्या जागी NetLabel वापरता येऊ शकते.

नेटवर्किंग

  • विविध TCP कंजेशन मोड्यूल्स जमा केलेत (2.6.13)

  • IPV6: Advanced API मध्ये विविध नविन sockopt / ancillary ला आधार (2.6.14)

  • IPv4/IPv6: UFO (UDP फ्रेगमेंटेशन ऑफलोड) पसरा-गोळा करा मार्ग (2.6.15)

    • UFO हे असे वैशिष्ट्य आहे कि ज्यात Linux कर्नल संजाळ स्टॅक मोठ्या UDP डेटाग्रामची IP फ्रॅगमेंटेशन कार्यक्षमता हार्डवेअरमध्ये ऑफलोड करेल. यामुळे मोठ्या UDP डेटाग्रामला MTU आकाराच्या पुंजक्यांमध्ये(पॅकेट्स) फ्रॅगमेंट करताना स्टॅकवर येणारा अतिभार(ओव्हरहेड) घटेल.

  • nf_conntrack उपप्रणाली जोडली (2.6.15)

    • अस्तित्वात असलेली netfilter मधील जोडणी शोधक उपप्रणाली फक्त ipv4 हाताळू शकते. ipv6 साठी जोडणी शोधक आधार जोडण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध होते; एकतर सर्व ipv4 जोडणी शोधक कोडची ipv6 मध्ये नक्कल करणे, किंवा (या पॅचेस मध्ये निवडलेला पर्याय) ipv4 आणि ipv6 या दोघांसही हाताळू शकेल अशा सर्वसामान्य स्तराची रचना करणे म्हणजे फक्त एकच सबप्रोटोकॉल(TCP, UDP, इ.) जोडणी शोधक सहाय्यक मोड्यूल लिहावा लागेल. प्रत्यक्षात, nf_conntrack कोणत्याही स्तर ३ प्रोटोकॉलसह काम करण्यास सक्षम आहे.

  • IPV6

    • RFC 3484- सुसंगत स्त्रोत पत्ता निवड (2.6.15)

    • राउटर पसंतींसाठी आधार जमा केला (RFC4191) (2.6.17)

    • राउटर रीचेबिलिटी प्रोबिंग जमा केली (RFC4191) (2.6.17)

    • बहू राउटिंग टेबल आणि धोरण राउटिंगसाठी अधिक आधार

  • बिनतारी अद्ययावतन

    • हार्डवेअर क्रिप्टो आणि फ्रॅगमेंटेशन ऑफलोड आधार

    • QoS (WME) आधार, "बिनतारी spy आधार"

    • संमिश्र PTK/GTK

    • CCMP/TKIP आधार आणि WE-19 HostAP आधार

    • BCM43xx बिनतारी ड्राइवर

    • ZD1211 बिनतारी ड्राइवर

    • WE-20, Wireless Extensions ची आवृत्ती 20(2.6.17)

    • हार्डवेअर-स्वतंत्र सॉफ्टवेअर MAC स्तर जोडण्यात आला, "Soft MAC" (2.6.17)

    • LEAP अधिप्रमाणन प्रकार जोडण्यात आला

  • सर्वसामान्य सेगमेंटेशन ऑफलोड जोडला आहे (GSO) (2.6.18)

    • काही बाबतींत कार्यशीलता सुधारू शकतो, तरीही तो ethtool द्वारे कार्यान्वित करावा लागतो

  • DCCPv6 (2.6.16)

हार्डवेअर आधार जोडण्यात आला

टीप

या विभागात फक्त सर्वाधिक सर्वसामान्य गुणविशेष मुल्यांकित केले आहेत.

  • x86-64 clustered APIC आधार (2.6.10)

  • Infiniband आधार (2.6.11)

  • हॉट प्लग

    • सर्वसामान्य स्मृती जोडा/काढा आणि स्मृती हॉटप्लगसाठी आधार फंक्शन्स जोडले (2.6.15)

  • SATA/libata सुधारणा, अतिरिक्त हार्डवेअर आधार

    • पुर्णतः पुन्हा काम केलेला libata त्रुटी नियंत्रक; या सर्व कामाच्या परिणामस्वरूप SATA उपप्रणाली अधिक सुदृढ बनावी जी बऱ्याच प्रकारच्या त्रुटींतून बरी होऊ शकते.

    • Native Command Queuing (NCQ), NCQ हा टॅग केलेल्या आज्ञा रांगां(queuing)चा SATA आवृत्ती आहे - एकाच ड्राइववर एकाच वेळी येऊन ठेपलेल्या अनेक I/O विनंत्या असू देण्याची क्षमता.(2.6.18)

    • हॉटप्लग आधार (2.6.18)

  • EDAC आधार (2.6.16)

    • EDAC चा उद्देश आहे प्रणाली मध्ये घडणाऱ्या चुका शोधणे आणि त्यांचा अहवाल देणे हा आहे.

  • Intel(R) I/OAT DMA इंजिन साठी नविन ioatdma ड्राइवर जमा केला(2.6.18)

NUMA (सुस्तिथी-नसेलेली स्मृती प्रवेश) / बहु-कोर

  • Cpusets (2.6.12)

    • Cpusets आता CPUs आणि मेमरी नोड्सचे संच कार्यांच्या(टास्क) संचास सोपवण्याची पद्धती पुरवतो. Cpusets कार्यांची CPU आणि कार्यांच्या मेमरी स्थानांस फक्त सद्य cpuset मधील संसाधनांपुरते निर्बंधित करतो. हे मोठ्या प्रणाल्यांवर अस्थायी कामांच्या स्थानांस व्यवस्थापित करण्यासाठी आवश्यक आहे.

  • NUMA-सक्षम स्लॅब नियंत्रक (2.6.14)

    • हे अनेक नोड्सवर स्लॅब निर्माण करते आणि स्लॅब्सना अशा प्रकारे व्यवस्थापित करते कि स्थानकांचे स्थानिकरण उत्तमोत्तम होते. प्रत्येक नोडची अपूर्ण, मुक्त आणि पूर्ण अशा स्लॅब्सची यादी असते. सर्व वस्तूं(ऑब्जेक्ट)साठी नोडचे स्थानिकरण नोड-संबंधी स्लॅब यादीद्वारे होते.

  • स्वॅप स्थानांतरण (2.6.16)

    • स्वॅप स्थानांतरण प्रक्रिया सुरू असताना NUMA प्रणालीतील नोड्स दरम्यान पानांची भौतिक जागा हलवण्यास सुकर करते.

  • अवाढव्य पाने (2.6.16)

    • अवाढव्य पानांसाठी NUMA पॉलिसी आधार जोडण्यात आला आहे: स्मृती(मेमरी) पॉलिसी स्तरामधील huge_zonelist() फंक्शन NUMA अंतराद्वारे क्रमबद्ध क्षेत्रांची(झोन) यादी पुरवते. hugetlb स्तर यादीमध्ये अवाढव्य पाने उपलब्ध असलेले परंतु तरीही सद्य cpuset च्या नोडसंचात असलेले क्षेत्र(झोन) शोधतो.

    • अवाढव्यपाने आता cpusets पाळतात.

  • प्रति-क्षेत्र VM मोजक

    • क्षेत्र-आधारित VM आकडेवारी पुरवा, जी क्षेत्र स्मृतीच्या कोणत्या अवस्थेत आहे हे ठरवण्यासाठी आवश्यक आहे

  • Netfilter ip_tables: NUMA-सतर्क स्थानिकरण. (2.6.16)

  • बहु-कोर

    • कोरांच्या दरम्यान वाटून घेतलेल्या कॅशेससह मल्टी-कोर दर्शवण्यासाठी नविन अनुसूचक(शेड्यूलर) डोमेन जोडली आहे. यामुळे अशा प्रणाल्यांवर हुशार cpu शेड्यूलिंग करणे शक्य होते,ज्यामुळे काही बाबतींत कामगिरीदेखील उत्तमरित्या सुधारते. (2.6.17)

    • CPU अनुसूचका(शेड्यूलर)साठी शक्ती(पॉवर) बचत पॉलिसी: multicore/smt cpus सह, शक्तीचा वापर सर्व CPUs मध्ये काम पसरवण्याऐवजी, काही संकुलांस आराम देऊन काही इतरांकडून सारे काम करवून सुधारला जाऊ शकतो.

( amd64 )



[1] हा मजकूर फक्त Open Publication License, v1.0 मध्ये उद्धृत अटी आणि शर्तींनुसार वितरित केला जाऊ शकतो, जो http://www.opencontent.org/openpub/ येथे उपलब्ध आहे.